शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

1 नव्हे तर 2 बॅटरीजसह आला Realme GT 2 5G Phone; सोबत 65W Charging, 12GB RAM 

By सिद्धेश जाधव | Published: January 05, 2022 12:37 PM

Realme GT 2 5G Phone Launch: realme GT 2 या फोनमध्ये 12GB RAM, 65W फास्ट चार्जिंग, 50MP कॅमेरा, Android 12 आणि 5000mAh ची बॅटरी असे स्पेक्स देण्यात आले आहेत.

Realme GT 2 5G Phone Launch: Realme GT 2 series चीनमध्ये सादर करण्यात आली आहे. या सीरिजमध्ये शक्तिशाली Realme GT 2 Pro सोबत कंपनीनं realme GT 2 लाँच केला आहे. या फोनमध्ये 12GB RAM, 65W फास्ट चार्जिंग, 50MP कॅमेरा, Android 12 आणि 5000mAh ची बॅटरी असे स्पेक्स देण्यात आले आहेत. चला जाणून घेऊया realme GT 2 चे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत.  

Realme GT 2 चे स्पेसिफिकेशन्स 

रियलमी जीटी 2 स्मार्टफोन 6.62 इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. कंपनीनं या डिस्प्लेला कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा दिली आहे. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित रियलमी युआय 3.0 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट आणि एड्रेनो 660 जीपीयूला देण्यात आला आहे. फोनमध्ये 12GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 256GB पर्यंत UFS 3.1 इंटरनल स्टोरेज मिळेल.  

फोटोग्राफीसाठी रियलमी जीटी 2 स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सोनी आईएमएक्स776 सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स471 सेन्सर फ्रंट कॅमेरा म्हणून देण्यात आला आहे. 

Realme GT 2 5G फोन बेसिक कनेक्टिव्हिटीफीचर्ससह इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी या फोनमध्ये 2,500एमएएचच्या दोन बॅटरीज देण्यात आल्या आहेत. ज्यात मिळून 5,000एमएएचची पॉवर देतात. ही बॅटरी 65वॉट फ्लॅश चार्जिंगला सपोर्ट करते.  

Realme GT 2 ची किंमत 

Realme GT 2 चे तीन तीन व्हेरिएंट्स चीनमध्ये सादर करण्यात आले आहेत. या फोनचा 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिएंट 2,699 युआन (अंदाजे 31,700₹) आणि 8 जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 2,899 युआन (सुमारे 34,000₹) मध्ये विकत घेता येईल. तर फोनच्या मोठ्या 12 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटसाठी 3,199 युआन (सुमारे 37,400₹) मोजावे लागतील.  

हे देखील वाचा:

बड्या कंपन्यांच्या पंगतीत Realme चा समावेश; 12GB RAM, Snapdragon 8 Gen 1 चिपसेटसह शक्तिशाली Realme GT 2 Pro लाँच

WhatsApp Scam 2022: 'सॉरी, तुम्ही कोण?' व्हॉट्सअ‍ॅपवरचा हा मेसेज करेल तुमचं बँक अकॉउंट रिकामं

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड