Realme Foldable Phone: Realme च्या Foldable Phone ची माहिती गेले कित्येक दिवस समोर येत आहे. आता Realme Design Studio ने एक कॉन्सॅप्ट फोल्डेबल फोनचे फोटो शेयर केले आहेत. हा फोन Realme GT 2 Fold नावाने सादर केला जाईल, असे सांगण्यात आले आहे. हा फोन डिजाईनच्या बाबतीत Samsung Galaxy Z Fold सारखा दिसत आहे. फक्त यात फोल्डेबल हिंज उजवीकडे आहेत. तसेच हा फोन अनफोल्ड करण्यासाठी फ्लिप करावा लागेल.
Realme GT 2 Fold
समोर आलेल्या कॉन्सॅप्टनुसार, फोनच्या बॅक पॅनलवर वर्तुळाकार कॅमेरा मॉड्युलमध्ये एलईडी फ्लॅश आणि ड्युअल कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा असेल. फोनचा बाहेरील डिस्प्ले 6.5 इंचाचा AMOLED पॅनल असेल. तर अनफोल्ड केल्यानंतर फोनमधील 8 इंचाचा फोल्डेबल AMOLED डिस्प्ले बघायला मिळेल. फोनच्या दोन्ही डिस्प्लेवर सेल्फी कॅमेऱ्यासाठी कट आउट देण्यात आली आहे. कॉन्सेप्टमध्ये या फोल्डेबल फोनच्या तळाला USB Type C चार्जिंग आणि स्पिकर ग्रिल दिसत आहे.
Realme GT 2 Fold ची किंमत
या स्मार्टफोनची किंमत सुमारे 1,200 अमेरिकन डोलत अर्थात 89,174 रुपये असू शकते, असे Realme Design Studio ने सांगितले आहे. जर या किंमतीत हा फोन आला तर हा डिवाइस Samsung च्या फोल्डेबल स्मार्टफोनपेक्षा खूप स्वस्त असेल. असे जरी असले तर अजून Realme ने या फोल्डेबल डिवाइसबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.