शहरं
Join us  
Trending Stories
1
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
2
पालघरमध्ये ठाकरे गटाला धक्का, भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
3
२०१९ च्या विधानसभेत मिळालेल्या जागा राखताना महायुतीची होणार दमछाक, उत्तर मध्य आणि पूर्व मुंबईत महायुतीसमोर मविआचे तगडे आव्हान
4
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
5
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: शरद पवार फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे मालक, तर सुप्रिया सुळे...
7
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
8
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
9
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
10
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
11
महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी
12
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
13
पत्नी, वडिलांचा अपमान करणाऱ्याचा काढला काटा, पनवेलमधील घटना, उत्तर प्रदेशातून १ अटकेत
14
मार्गिकांसाठी आता वांद्रे-खार पादचारी पूल तोडणार, पश्चिम रेल्वेवरील हार्बरचे वेळापत्रक ६ महिने विस्कळीत राहणार
15
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
16
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
17
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
19
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
20
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 

शाओमीवर आणखी एक वार! दोन बॅटरीज असलेल्या Realme GT2 च्या लाँचची तारीख ठरली  

By सिद्धेश जाधव | Published: April 19, 2022 12:41 PM

Realme GT2 स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची तारीख समजली आहे. लवकरच हा फोन Snapdragon 888 प्रोसेसर, 12GB RAM, 120Hz रिफ्रेश रेट, 5000mAh बॅटरी आणि 65W फास्ट चार्जिंगसह येऊ शकतो.  

Realme एकापेक्षा एक भन्नाट स्मार्टफोन्स भारतात लाँच करत आहे. असाच एक स्मार्टफोन Realme GT 2 नावानं भारतात येणार आहे. चीनमध्ये हा फोन आधीच लाँच झाला आहे, जो कमी किंमतीत फ्लॅगशिप अनुभव देतो. तिथे हा डिवाइस 12GB RAM, 65W फास्ट चार्जिंग, 50MP कॅमेरा, Android 12 आणि 5000mAh च्या बॅटरीसह लाँच झाला आहे.  

आता कंपनी भारतात Realme GT2 लाँच करण्याची तयारी करत आहे. हा फोन येत्या 4 मे ला देशात लाँच होईल, अशी माहिती टिपस्टर मुकुल शर्मानं दिली आहे. फोनचे पेपर व्हाईट, स्टील ब्लॅक आणि पेपर ग्रीन असे तीन कलर व्हेरिएंट बाजारात येतील. हा फोन 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज आणि 12 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेजसह भारतात विकत घेता येईल, असं देखील मुकुलनं सांगितलं आहे.  

Realme GT 2 चे स्पेसिफिकेशन्स  

रियलमी जीटी 2 स्मार्टफोनमध्ये 6.62 इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. कंपनीनं या डिस्प्लेला कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा दिली आहे. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित रियलमी युआय 3.0 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट आणि एड्रेनो 660 जीपीयूला देण्यात आला आहे. फोनमध्ये 12GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 256GB पर्यंत UFS 3.1 इंटरनल स्टोरेज मिळेल. 

फोटोग्राफीसाठी रियलमी जीटी 2 स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सोनी आयएमएक्स776 सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स471 सेन्सर फ्रंट कॅमेरा म्हणून देण्यात आला आहे. 

Realme GT 2 5G फोन बेसिक कनेक्टिव्हिटीफीचर्ससह इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 2,500एमएएचच्या दोन बॅटरीज देण्यात आल्या आहेत. ज्यात मिळून 5,000एमएएचची पॉवर देतात. ही बॅटरी 65वॉट फ्लॅश चार्जिंगला सपोर्ट करते. 

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडMobileमोबाइल