Realme GT 2 Pro स्मार्टफोन लवकरच ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. आता लाँचपूर्वीच या फोनच्या कॅमेरा स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. Weibo वरून Realme नं या डिवाइसमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपची माहिती दिली आहे. तसेच या रियलमी GT 2 सीरीजमध्ये GT 2, GT 2 Pro आणि GT 2 Master Edition असे तीन फोन्स येतील.
Realme GT 2 Pro
Realme GT 2 स्मार्टफोन सीरीज 4 जानेवारीला चीनमध्ये लाँच होणार आहे. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार Realme GT 2 Pro मध्ये 50MP चा Sony IMX766 प्रायमरी कॅमेरा असेल, जो OIS फीचरसह येईल. सोबत फोनमध्ये 50MP चा सेकंडरी सेन्सर देण्यात येईल, जो 150 डिग्री फील्ड ऑफ व्यूला सपोर्ट करेल. हा जगातील पहिला ब्रँड असेल जो असा वाईड अँगल कॅमेरा असलेला फोन घेऊन येत आहे, असा दावा कंपनीनं केला आहे. अजून एका पोस्टमधून कंपनीनं मायक्रोस्कोप 2.0 नाव देत तिसरा कॅमेरा सेन्सर टीज केला आहे. ही लेन्स ‘एक्सट्रीम मायक्रो’ फोटोज घेऊ शकेल.
तसेच कंपनीनं रियलमी GT 2 Pro देखील टीज केला आहे. या टीजरमध्ये कंपनीनं Dragon Ball Z सह भागेदारी केल्याचा इशारा दिला आहे. कंपनीनं चीनी सोशल मीडियावर हा टीजर ‘Realme X Dragon Ball Z’ सह शेयर केला आहे. नव्वदीच्या दशकात लोकप्रिय अॅनिमे सीरिज Dragon Ball Z सह भागेदारी करून कंपनी खास एडिशन सादर करू शकते.
हे देखील वाचा:
WhatsApp वर ग्रुप न बनवता 256 लोकांना एकसाथ द्या New Year च्या शुभेच्छा, वापरा सिक्रेट फिचर
आत्ताच घ्या नववर्षाचं गिफ्ट! 11 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह Samsung चा बेस्ट 5G Phone