Realme नं गेल्यावर्षी जागतिक बाजारात आपला अल्ट्रा-फ्लॅगशिप स्मार्टफोन Realme GT 2 Pro 5G लाँच केला होता. यात Snapdragon 8 Gen 1, 12 GB RAM, 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि 65W फास्ट चार्जिंग असे दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. आता हा दमदार फोन भारतात येणार आहे, अशी माहिती रियलमीचे व्हीपी Madhav Sheth यांनी दिली आहे.
Realme GT 2 Pro 5G च्या भारतीय लाँचची अचूक अशी तारीख समोर आली नाही. परंतु Realme 9 Pro सीरीज नंतर हा फोन देशात येऊ शकतो. सोबत Realme GT 2 देखील एंट्री करू शकतो. तसेच माधव सेठ यांनी रियलमी जीटी 2 प्रोमध्ये “सर्व अँड्रॉइड फोन्स पैकी सर्वात चांगला फ्लॅट डिस्प्ले” असेल, असं म्हटलं आहे.
Realme GT 2 Pro चे स्पेसिफिकेशन
रियलमी जीटी 2 प्रो स्मार्टफोन 2K LTPO AMOLED डिस्प्लेसह येणारा जगातील पहिला स्मार्टफोन आहे. हा एक 1440 x 3216 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.7 इंचाचा डिस्प्ले आहे. जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट, 1000हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट, 1400निट्स ब्राईटनेस, 5000000:1 कॉन्ट्रास्ट रेशियो आणि 1.07 बिलियन कलरला सपोर्ट करतो. कंपनीनं या डिस्प्लेला कोर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टसची सुरक्षा दिली आहे.
शक्तिशाली Qualcomm Snapdragon 8 Gen 1 चिपसेट realme GT 2 Pro स्मार्टफोनची खासियत म्हणता येतील. हा फोन अँड्रॉइड 12 ओएस आधारित रियलमी युआय 3.0 वर चालतो. कंपनीनं यात 12GB पर्यंत RAM आणि 512GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज देखील दिली आहे. या फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, जी 65W SuperDart फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.
फोटोग्राफीसाठी हा फ्लॅगशिप रियलमी फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सोनी आईएमएक्स766 सेन्सर आहे. सोबत 50 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. समोर 32 मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स615 सेन्सर सेल्फी कॅमेऱ्याचे काम करतो.
हे देखील वाचा: