शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
3
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
4
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
5
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
6
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
10
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
11
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
12
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
13
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
14
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
16
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
18
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
19
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

भन्नाट ऑफर! Realme च्या नव्या शक्तिशाली फोनवर 5 हजारांचा डिस्काउंट आणि स्मार्टवॉच फ्री 

By सिद्धेश जाधव | Published: April 14, 2022 11:33 AM

12GB RAM, 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि 65W फास्ट चार्जिंगसह आलेला Realme GT 2 Pro स्मार्टफोनचा आज पहिला सेल आहे.  

Realme नं आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन Realme GT 2 Pro गेल्याच आठवड्यात भारतात सादर केला होता. आज या फ्लॅगशिप किलरचा पहिला सेल आहे. ज्यात 12GB RAM, 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि 65W फास्ट चार्जिंगसह आलेला Realme GT 2 Pro स्मार्टफोन तुम्ही डिस्काउंटसह विकत घेऊ शकता. तसेच मोफत गिफ्ट देखील कंपनी देणार आहे.  

Realme GT 2 Pro ची किंमत आणि ऑफर्स  

Realme GT 2 Pro चा पहिला सेल आज म्हणजे 14 एप्रिल दुपारी 12 वाजता सुरु होईल. या फोनचा 8GB RAM आणि 128GB स्टोरेज मॉडेल 49,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. 12GB RAM आणि 256GB स्टोरेज असलेल्या टॉप एन्ड मॉडेलची किंमत 57,999 रुपये आहे. हा फोन पेपर व्हाईट आणि पेपर ग्रीन कलरमध्ये विकत घेता येईल. 

हा मोबाईल कंपनीच्या अधिकृत वेबसाईटसह फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल. लाँच ऑफर अंतगर्त कंपनी या फोनवर 5 हजार रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट दिला जात आहे. यासाठी तुम्हाला HDFC किंवा SBI च्या कार्डनं पेमेंट करावं लागेल. इतकंच नव्हे तर कंपनी या फोनच्या खरेदीवर 4,999 रुपयांचं Realme Watch S मोफत देणार आहे.  

Realme GT 2 Pro चे स्पेसिफिकेशन  

रियलमी जीटी 2 प्रो स्मार्टफोन 2K LTPO AMOLED डिस्प्लेसह येणारा जगातील पहिला स्मार्टफोन आहे. हा एक 1440 x 3216 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.7 इंचाचा डिस्प्ले आहे. जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट, 1000हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट, 1400निट्स ब्राईटनेस, 5000000:1 कॉन्ट्रास्ट रेशियो आणि 1.07 बिलियन कलरला सपोर्ट करतो. कंपनीनं या डिस्प्लेला कोर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टसची सुरक्षा दिली आहे.  

फोटोग्राफीसाठी हा फ्लॅगशिप रियलमी फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सोनी आयएमएक्स766 सेन्सर आहे. सोबत 50 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. समोर 32 मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स615 सेन्सर सेल्फी कॅमेऱ्याचे काम करतो.  

शक्तिशाली Qualcomm Snapdragon 8 Gen 1 चिपसेट realme GT 2 Pro स्मार्टफोनची खासियत म्हणता येतील. हा फोन अँड्रॉइड 12 ओएस आधारित रियलमी युआय 3.0 वर चालतो. कंपनीनं यात 12GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज देखील दिली आहे. या फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, जी 65W SuperDart फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.   

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान