Realme नं काही दिवसांपूर्वी आपल्या GT सीरीजमधील Realme GT 2 Pro स्मार्टफोनची घोषणा केली होती. हा फोन येत्या 20 डिसेंबरला जागतिक बाजारात लाँच केला जाईल. परंतु आता पहिल्यांदाच या सीरिजमधील अजून एका फ्लॅगशिप फोनची माहिती समोर आली आहे. हा फोन Realme GT 2 नावानं बाजारात सादर केला जाईल.
Realme GT 2 स्मार्टफोन Realme India च्या वेबसाईटवर दिसला आहे. नाव वगळता या फोनची इतर कोणतीही माहिती मिळाली नाही. ही लिस्टिंग सर्वप्रथम 91Mobile नं स्पॉट केली आहे. हा फोन 2022 च्या पहिल्या तिमाहीत सीरिजमधील प्रो व्हेरिएंटच्या आधी सादर केला जाऊ शकतो. फीचर्स आणि स्पेक्सच्या बाबतीत हा फोन Realme GT 5G चा अपग्रेड व्हर्जन असू शकतो, जो गेल्यावर्षी सादर करण्यात आला आहे.
Realme GT 2 Pro चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
Realme GT 2 Pro सर्वप्रथम 20 डिसेंबरला चीनमध्ये लाँच केला जाईल. हा कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात महागडा अल्ट्रा प्रीमियम फ्लॅगशिप फोन असू शकतो. यात 150 डिग्रीचा कॅमेरा मिळू शकतो. तसेच Qualcomm Snpadragon 8 Gen 1 चिपसेटसह येणारा हा पहिला रियलमी असेल. फोनमध्ये 12GB पर्यंत RAM आणि 1TB पर्यंत स्टोरेज मिळू शकते.
या फोनमध्ये 6.7 इंचाचा QHD+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो. जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. फोनच्या मागे 50MP चे दोन केमेरे मिळतील. तर सेल्फीसाठी 32MP चा कॅमेरा मिळू शकतो. हा स्मार्टफोन 125W फास्ट चार्जिंगला सपोर्टसह येईल, असं देखील सांगण्यात आलं आहे.
हे देखील वाचा:
स्मार्टफोन, स्मार्ट टीव्हीवर मिळतेय भरघोस सूट; OnePlus 9 सीरीजवर 8,000 रुपयांपर्यंतची बचत
iPhone-iPad चा पासवर्ड विसरलात? काही मिनिटांत करा रिसेट, जाणून घ्या सोप्पी पद्धत