काही दिवसांपूर्वी रियलमीने एक फ्लॅगशिप स्मार्टफोन Realme GT नावाने लाँच केला होता. आता कंपनीने Realme GT 2 वर काम करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी रियलमीच्या अधिकृत वेबसाइटवर Realme GT 2 दिसला होता. आता रियलमीचे प्रेजिडेंट वांग वेई डेरेक यांनी चिनी सोशल मीडिया साईट विबोवरून कंपनी Realme GT 2 वर करत असल्याची माहिती दिली आहे.
Realme GT 2
रियलमीचे प्रेजिडेंट वांग वेई डेरेक यांनी Weibo वरून सांगितले आहे कि, Realme GT 2 मध्ये Snapdragon 895 देण्यात येईल. Snapdragon 895 अजून लाँच देखील झाला नाही. हा नेक्स्ट जेनरेशन फ्लॅगशिप प्रोसेसर यावर्षीच्या शेवटी लाँच केला जाऊ शकतो. त्यामुळे Realme GT 2 हा स्मार्टफोन Snapdragon 895 सह सादर होणारा पहिला स्मार्टफोन असू शकतो, अशी चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या Realme GT नंतर कंपनी Realme GT Master Edition वर देखील काम करत असल्याची चर्चा आहे. मास्टर एडिशनमधील कॅमेऱ्यासाठी रियलमीने कॅमेरा ब्रँड Kodak सोबत भागेदारी केल्याची बातमी आली आहे.
Realme GT 5G चे स्पेसिफिकेशन
Realme GT 5G मध्ये 6.43-इंचाचा FHD+ सुपर अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटवर चालतो. हा डिस्प्ले कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 888 5G एसओसी आणि Adreno 660 GPU देण्यात आला आहे.
कॅमेऱ्यासाठी Realme GT 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 64 मेगापिक्सलच्या मुख्य सेन्सरसह 8 मेगापिक्सलची वाइड-अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. फोनच्या फ्रंटला 16 मेगापिक्सलच्या सेल्फी शुटर देण्यात आला आहे. सुरक्षेसाठी फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. तसेच, फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 65W फास्ट चार्जिंगसह 4,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
Realme GT 5G ची किंमत
रियलमी जीटी 5जी फोन युरोपमध्ये दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच केला गेला आहे. फोनच्या छोट्या व्हेरिएंटमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे, या व्हेरिएंटची किंमत 449 यूरो म्हणजे जवळपास 39,800 रुपये आहे. तसेच, या फोनच्या मोठ्या व्हेरिएंटमध्ये 12 जीबी रॅमसह 256 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे, या मॉडेलची किंमत 599 यूरो म्हणजे अंदाजे 53,200 रुपये आहे.