Realme ने गेल्याच महिन्यात आपली फ्लॅगशिप Realme GT सीरिज जागतिक बाजारात लाँच केली होती. यातील Realme GT 5G स्मार्टफोन कंपनीने युरोपात लाँच केला होता. क्वॉलकॉमचा शक्तिशाली Snapdragon 888 चिपसेट आणि 12GB रॅम असेलला Realme GT 5G स्मार्टफोन येत्या 18 ऑगस्टला भारतात लाँच केला जाईल, अशी माहिती रियलमी इंडियाचे सीईओ माधव सेठ यांनी दिली आहे.
Realme GT भारतात जागतिक स्पेसिफिकेशन्ससह लाँच केला जाईल, असे माधव सेठ यांनी सांगितले आहे. या फ्लॅगशिप रियलमी फोनचा फक्त 5G व्हर्जन भारतात येईल आणि सोबत Realme GT Master Edition देखील 18 ऑगस्टला लाँच केला जाईल. यापैकी मास्टर एडिशनची किंमत 30,000 रुपयांपेक्षा कमी ठेवली जाईल, अशी माहिती माधव सेठ यांनी दिली आहे.
Realme GT 5G चे स्पेसिफिकेशन
Realme GT 5G मध्ये 6.43-इंचाचा FHD+ सुपर अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटवर चालतो. हा डिस्प्ले कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 888 5G एसओसी आणि Adreno 660 GPU देण्यात आला आहे.
कॅमेऱ्यासाठी Realme GT 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 64 मेगापिक्सलच्या मुख्य सेन्सरसह 8 मेगापिक्सलची वाइड-अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. फोनच्या फ्रंटला 16 मेगापिक्सलच्या सेल्फी शुटर देण्यात आला आहे. सुरक्षेसाठी फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. तसेच, फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 65W फास्ट चार्जिंगसह 4,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.