काही दिवसांपूर्वी Realme ने घोषणा केली होती कि कंपनी 21 जुलैला एका इव्हेंटचे आयोजन करणार आहे. या लाँच इव्हेंटच्या माध्यमातून Realme GT Master Edition आणि Realme GT Explorer Master Edition सादर केले जाऊ शकतात. आता Realme GT Explorer Master Edition स्मार्टफोनच्या फ्रंट पॅनलची डिजाईन समोर आली आहे.
Realme GT Explorer Master Edition
Realme GT Explorer Master Edition स्मार्टफोनच्या फ्रंटला फ्लॅगशिप लेवल कर्व डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा डिस्प्ले फ्लेक्सिबल ओएलईडी असू शकतो. या डिस्प्लेच्या डाव्या कोपऱ्यावर सिंगल कटआउट दिला जाऊ शकतो, या कटआऊटमध्ये सेल्फी कॅमेरा दिला आहे. या डिजाईनसोबतच काही स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे.
Realme GT Explorer Master Edition स्मार्टफोन क्वालकॉमच्या Snapdragon 870 चिपसेटसह सादर केला जाऊ शकतो, याची माहिती कंपनीने दिली आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 360Hz टच सॅम्पलिंग रेट दिला जाऊ शकतो. फोनमधील डिस्प्ले HDR10+ सर्टिफिकेशन, 1100nits ब्राईटनेस, 10240 लेवल डिमिंग ब्राईटनेसला सपोर्ट करू शकतो. Realme GT Explorer Master Edition स्मार्टफोन जापानचे प्रसिद्ध डिजाइनर Naoto Fukasawa यांनी डिजाईन केला आहे. या फोनचा बॅक पॅनल एखाद्या सूटकेससारखा दिसतो.
Realme GT Master Edition संभाव्य स्पेसिफिकेशन्स
Realme GT Master Edition स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत. या फोनमध्ये 6.43 इंचाचा फुल एचडी+ एसअॅमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. Realme GT Master Edition स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा Snapdragon 778 चिपसेट दिला जाऊ शकतो. रियलमीचा हा फोन Android 11 वर आधारित Realme 2.0 वर चालेल.