4 ऑगस्टला रियलमीने MagDart नावाची चार्जिंग टेक्नॉलॉजी सादर केली होती. ही टेक्नॉलॉजी सादर करताना सांगण्यात आले होते कि Realme GT Flash हा पहिला स्मार्टफोन असेल जो या चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल. आता या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. Realme GT Flash स्मार्टफोनमध्ये वर्तुळाकार मॅग्नेटिक चार्जिंग कॉइल देण्यात येईल जी MagDart चार्जर आणि अॅक्सेसरीजला सपोर्ट करेल. हा पहिला अँड्रॉइड स्मार्टफोन असेल जो मॅग्नेटिक चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल. Realme ने या स्मार्टफोनची थोडी माहिती शेयर केली होती, परंतु आता नवीन लीक रिपोर्टमध्ये Realme GT Flash ची सविस्तर माहिती मिळाली आहे.
Realme GT Flash चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
प्रसिद्ध टिपस्टर अभिषेक यादवने ट्वीट करून Realme GT Flash स्मार्टफोनची माहिती शेयर केली आहे. या लीकनुसार, Realme GT Flash स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा E4 sAMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा डिस्प्ले QHD+ रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकतो. या रियलमी स्मार्टफोनमध्ये लिस्ट्स फ्लॅगशिप Snapdragon 888 Plus चिपसेट देण्यात येईल. त्याचबरोबर लेस्टस्ट LPDDR5 RAM आणि फास्ट UFS 3.1 स्टोरेज दिली जाऊ शकते.
या फोनमध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशनसह 50 मेगापिक्सलचा Sony IMX766 प्राइमरी सेन्स, 50 मेगापिक्सलचा IMX766 कॅमेरा सेन्सर आणि एक 2 मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो. Realme GT Flash स्मार्टफोनमध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात येईल. Realme GT Flash स्मार्टफोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. वर सांगितल्याप्रमाणे ही बॅटरी MagDart वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करेल. हा रियलमी स्मार्टफोन 50W MagDart वायरलेस चार्जिंग आणि 65W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकतो. त्याचबरोबर रियलमीचा हा फोन NFC, लीनियर मोटर आणि ड्युअल स्पिकरसह सादर केला जाऊ शकतो.