शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
2
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
3
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
4
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
5
Exclusive: 'युध्रा' मधून साऊथ ब्युटीचं हिंदीत पदार्पण, म्हणाली, "सिनेमात केवळ बाहुली बनून..."
6
अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?
7
'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट
8
तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"
9
'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी
10
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
11
४०० पारचा प्रयत्न फसला; ३७ धावांत ४ विकेट्स! ३७६ धावसंख्येवर आटोपला टीम इंडियाचा पहिला डाव
12
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
13
Piccadily Agro Share : ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
14
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
15
Post Office Saving Scheme : Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
16
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
17
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
18
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
19
Aadhaar Card : Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
20
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...

रियलमीचा धमाकेदार 5G फोन येणार भारतात; Realme GT Neo 2 कंपनीच्या इंडियन वेबसाईटवर लिस्ट 

By सिद्धेश जाधव | Published: October 04, 2021 7:03 PM

Realme GT Neo 2 5G price in India: Realme GT Neo 2 5G भारतात कोणत्या तारखेला सादर केला जाईल हे मात्र अजून अधिकृतपणे समोर आले नाही. परंतु हा फोन ऑक्टोबरच्या दुसऱ्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात सादर केला जाऊ शकतो.

रियलमी इंडियाने काही दिवसांपूर्वी सांगितले होते कि, जागतिक बाजारात सादर झालेला Realme GT Neo 2 स्मार्टफोन भारतात येत आहे. हा 5G Phone आता कंपनीच्या इंडियन वेबसाईटवर देखील लिस्ट झाला आहे. Realme GT Neo 2 5G चे प्रोडक्ट पेज भारतीय वेबसाईटवर लाईव्ह झाल्यामुळे लवकरच हा फोन भारतीयांच्या भेटीला येईल, हे स्पष्ट झाले आहे.  

Realme GT Neo 2 5G भारतात कोणत्या तारखेला सादर केला जाईल हे मात्र अजून अधिकृतपणे समोर आले नाही. परंतु हा फोन ऑक्टोबरच्या दुसऱ्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात सादर केला जाऊ शकतो. आशा आहे कि Realme GT Neo2 5G फोन चीनमध्ये सादर झालेल्या स्पेसिफिकेशन्ससह भारतात देखील दाखल होईल.  

Realme GT Neo2 चे स्पेसिफिकेशन्स  

Realme GT Neo2 चा डिस्प्ले खूप खास स्पेसिफिकेशन्ससह सादर केला आहे. कंपनीने यात Samsung E4 Display वापरला आहे, जो पंच होल आणि पूर्णपणे बेजललेस डिजाईनसह सादर करण्यात आला आहे. या फुलएचडी+ रिजोल्यूशन असलेल्या डिस्प्लेचा आकार 6.62 इंच आहे. हा डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश, 600हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट, 1300निट्स ब्राईटनेस आणि 500000:1 कॉन्ट्रास्ट रेशियोला सपोर्ट करतो, तसेच या डिस्प्लेला कोर्निंग गोरिल्ला ग्लासची सुरक्षा देण्यात आली आहे.   

Realme GT Neo2 स्मार्टफोनला क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 870 या 5G चिपसेटकडून  प्रोसेसिंग पॉवर मिळते. हा मोबाईल अँड्रॉइड 11 आधारित रियलमी युआय 2.0 वर चालतो.  या डिवाइसमध्ये 12GB पर्यंतचा RAM आणि 256GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. रियलमी जीटी नियो2 मधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 64MP चा मुख्य सेन्सर, 8 MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 MP ची पोर्टरेट लेन्स देण्यात आली आहे. या फोनमध्ये 16 MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि बेसिक कनेक्टिव्हिटी ऑप्शन्ससह यात 65वॉट फास्ट चार्जिंगसह 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.    

Realme GT Neo2 ची किंमत   

  • 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट: RMB 2,499 (सुमारे 28,500 रुपये)   
  • 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंट: RMB 2,699 (सुमारे 30,700 रुपये)   
  • 12GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंट: RMB 2,999 (सुमारे 34,200 रुपये)   
टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड