Realme ने एका नव्या प्रीमियम स्मार्टफोनवर काम करत आहे. हा स्मार्टफोन यावर्षी चीनमध्ये सादर झालेल्या रियलमी GT Neo चा अपग्रेडेड व्हेरिएंट असू शकतो, जो Realme GT Neo 2 नावाने बाजारात येईल. आता टेक वेबसाइट डिजिट आणि ऑनलीक्सने मिळून Realme GT Neo 2 चे रेंडर्स आणि स्पेसिफिकेशन लीक केले आहेत. Realme GT Neo2 हा सर्वात हलका आणि स्लिम स्मार्टफोन असेल. कंपनीने मात्र अजूनतरी Realme GT Neo 2 बाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.
Realme GT Neo 2 ची डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्स
रिपोर्टमधील रेंडर्सनुसार, Realme GT Neo 2 मध्ये 6.62 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात येईल. हा एक पंच होल डिस्प्ले असेल. फ्रंटला डावीकडे वरच्या बाजूला असेलेल्या या पंच होलमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात येईल. या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर मिळेल, त्यामुळे फोनमधील डिस्प्ले अॅमोलेड पॅनल असू शकतो. GT Neo 2 रेंडर्समध्ये कुठेही 3.5mm हेडफोन जॅक दिसत आहे. परंतु सिम ट्रे स्लॉट, टाइप-सी पोर्ट आणि स्पिकर ग्रिल फोनच्या तळाला देण्यात आले आहेत. उजवीकडे वॉल्यूम कंट्रोल बटण तर पावर बटण डावीकडे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हा फोन स्नॅपड्रॅगन 870 SoC सह येईल. तसेच या रियलमी फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात येईल. Realme GT Neo 2 डिवाइस अँड्रॉइड 11-आधारित Realme UI 2.0 वर चालेल. तसेच या फोनमधील 5000 एमएएचची बॅटरी 65W किंवा 50W फास्ट चार्जिंगसह सादर केली जाऊ शकते. या फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 64MP चा मुख्य कॅमेरा, 8MP चा अल्ट्रावाईड कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर मिळेल. पुढील काही आठवड्यात हा फोन चीनमध्ये सादर होऊ शकतो.