Realme नं चीनमध्ये ‘जीटी’ सीरीजचा नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. Realme GT Neo 3 स्मार्टफोननं 12GB RAM, MediaTek Dimensity 8100 SoC, 50MP Rear Camera, 32MP Selfie Camera आणि 150W Fast Charging टेक्नॉलॉजीसह एंट्री घेतली आहे. या फोनची 4500mAh ची बॅटरी फक्त 5 मिनिटांत अर्धी चार्ज होऊ शकते, असा दावा कंपनीनं केला आहे. लवकरच हा स्मार्टफोन भारतीयांच्या भेटीला देखील येऊ शकतो.
Realme GT Neo 3 चे स्पेसिफिकेशन्स
रियलमी जीटी नियो 3 टेक मंचावर 6.7 इंचाच्या फुलएचडी+ अॅमोलेड डिस्प्लेसह आला आहे. जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 1000हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. या पंच-होल पॅनलला कोर्निंग गोरिल्ला ग्लासची सुरक्षा आहे.
Realme GT Neo 3 मध्ये अँड्रॉइड 12 ओएस आधारित रियलमी युआय 3.0 आहे. प्रोसेसिंगसाठी कंपनी मीडियाटेक डिमेनसिटी 8100 चिपसेट आणि ग्राफिक्ससाठी माली जी610 जीपीयूचा वापर करण्यात आला आहे. सोबत 12 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळते.
Realme GT Neo 3 च्या मागे असेल्या ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर मिळतो. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा टेली मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. बेसिक कनेक्टिव्हिटीसह यात इन-डिस्प्ले फिंगर सेन्सरची सुरक्षा मिळते.
Realme GT Neo 3 चे वेगवेगळ्या बॅटरी आणि चार्जिंग स्पीडचे दोन मॉडेल आहेत. यातील 4,500एमएएचच्या बॅटरीसह 150वॉट फास्ट चार्जिंग मिळते. तर 5,000एमएएच बॅटरी असलेला मॉडेल 80वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. या फोनची किंमत 1,999 युआन (सुमारे 24,000) पासून सुरु होते.