काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की Realme अजून एका 150W फास्ट चार्जिंग असलेल्या स्मार्टफोनवर काम करत आहे. आता Realme GT Neo 3T स्मार्टफोनची लाँच डेट खुद्द कंपनीनं सांगितली आहे. रियलमी इंडोनेशियाच्या ट्विटनुसार, Realme GT Neo 3T स्मार्टफोन येत्या 7 जूनला लाँच करण्यात येईल. सर्वप्रथम इंडोनेशियामध्ये लाँच झाल्यानंतर भारतासह इतर बाजारपेठेमधील ग्राहकांच्या भेटीला हा डिवाइस येऊ शकतो.
कंपनीनं Realme GT Neo 3T ची फक्त लाँच डेट सांगितली नाही तर महत्वाच्या स्पेक्सचा देखील खुलासा केला आहे. जागतिक बाजारात आलेल्या Realme GT Neo 3 स्मार्टफोन प्रमाणे Realme GT Neo 3T मध्ये देखील 150 वॉट फास्ट चार्जिंग मिळेल. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार आगामी रियलमी स्मार्टफोन चीनमध्ये आलेल्या रियलमी क्यू5 प्रोचा रीब्रँडेड व्हर्जन असू शकतो.
संभाव्य स्पेसिफिकेशन्स
गीकबेंच लिस्टिंगनुसार Realme GT Neo 3T स्मार्टफोन 8 जीबी आणि 12 जीबी रॅम ऑप्शनमध्ये सादर केला जाऊ शकतो. सोबत 256 जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते आणि यात मायक्रो एसडी कार्डला सपोर्ट मिळणार नाही. हा फोन अँड्रॉइड 12 बेस्ड Realme UI 3.0 वर चालेल. यातील 5000mAh ची बॅटरी 150 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह बाजारात येईल.
फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा असेल. सेल्फीसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल. फोनमध्ये 1080x2400 पिक्सल रिजोल्यूशनसह 6.62 इंचाचा फुल एचडी+ AMOLED डिस्प्ले मिळेल. जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार भारतात Realme GT Neo 3T स्मार्टफोन 35 हजार रुपयांच्या आसपास सादर केला जाऊ शकतो.