ओप्पोचा सब-ब्रँड म्हणून भारतात आल्यांनतर आता रियलमीने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. रियलमी कमी किंमतीत स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन्स सादर करण्यासाठी ओळखली जाते. शाओमी आणि रियलमीची नेहमीच टक्कर सुरु असते. आता स्मार्टफोन्सच्या किंमती वाढवण्याच्या बाबतीत देखील या दोन्ही कंपन्या स्पर्धा करत असल्याचे वाटत आहे. एकीकडे शाओमी आपल्या काही स्मार्टफोन्सच्या किंमती वाढवत आहे तर आता रियलमीने 12 स्मार्टफोन्सच्या किंमती वाढवल्या आहेत. 91mobiles ने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने Realme 8 5G आणि Realme 8 4G पासून रियलमी C सीरीज मधील फोन्सच्या किंमत 300 ते 1,000 रुपयांनी वाढवल्या आहेत.
गेल्याच महिन्यात रियलमीने रियलमी 8 सीरीज आणि रियलमी सी सीरीज सीरिजची किंमत वाढवली आहे. तर या महिन्यात किंमत वाढवण्याची ही दुसरी वेळ आहे. त्यामुळे काही स्मार्टफोन्सच्या किंमतीत वाढ होण्याची ही तिसरी वेळ आहे. 91मोबाईल्सला ही माहिती ऑफलाइन स्टोरकडून मिळाली आहे, परंतु कंपनीच्य वेबसाइटवर देखील नवीन किंमतीसह स्मार्टफोन लिस्ट झाले आहेत. चला जाणून घेऊया कोणत्या स्मार्टफोनच्या किंमतीत किती वाढ झाली आहे.
स्मार्टफोनचे नाव | झालेली वाढ (रुपये) | नवीन किंमत (रुपये) |
---|---|---|
Realme C11 (2GB/32GB) | 300 | 7,299 |
Realme C11 (4GB/64GB) | 300 | 8,799 |
Realme C21 (3GB/32GB) | 500 | 8,999 |
Realme C21 (4GB/64GB) | 500 | 9,999 |
Realme C25s (4GB/64GB) | 500 | 10,999 |
Realme C25s (4GB/128GB) | 500 | 11,999 |
Realme 8 4G (4GB/128GB) | 1000 | 15,999 |
Realme 8 4G (6GB/128GB) | 1000 | 16,999 |
Realme 8 4G (8GB/ 128GB) | 1000 | 17,999 |
Realme 8 5G (4GB/ 64GB) | 1000 | 15,499 |
Realme 8 5G (4GB/128GB) | 1000 | 16,499 |
Realme 8 5G (8GB/128GB) | 1000 | 18,499 |