रियलमीने आपल्या Realme Narzo 30 5G स्मार्टफोनचा नवीन व्हेरिएंट लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज देण्यात आली आहे. याआधी Realme Narzo 30 5G चा फक्त एक 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हर्जन बाजारात उपलब्ध होता, ज्याची किंमत 15,999 रुपये आहे. नवीन व्हर्जनचे इतर स्पेसिफिकेशन्स तसेच ठेवण्यात आले आहेत, फक्त रॅम आणि स्टोरेज कमी करण्यात आली आहे. त्यामुळे हा स्वस्त 5G स्मार्टफोन अजून स्वस्त झाला आहे.
Realme Narzo 30 5G ची किंमत
Realme Narzo 30 5G चे दोन व्हेरिएंट आता भारतात उपलब्ध झाले आहेत. यातील मोठ्या व्हर्जनची किंमत 15,999 रुपये ठेवण्यात आली आहे, ज्यात 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट मिळते. तर नवीन व्हेरिएंटची किंमत 13,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन रियलमी इंडियाची वेबसाइट, फ्लिपकार्ट आणि इतर मेनलाइन स्टोर्सवर 24 ऑगस्टपासून उपलब्ध होईल. हे देखील वाचा: 15,600mAh क्षमता असलेल्या अवाढव्य बॅटरीसह ‘हा’ 5G स्मार्टफोन लाँच; सिंगल चार्जमध्ये मिळणार 6 दिवसांचा बॅकअप
Realme Narzo 30 5G चे स्पेसिफिकेशन्स
Realme Narzo 30 5G मध्ये कंपनीने 6.5 इंचाचा 2400×1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल FHD+ डिस्प्ले दिला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. हा स्मार्टफोन मीडियाटेकच्या Dimensity 700 चिपसेटसह सादर करण्यात आला आहे. फोन 6GB पर्यंतचा रॅम आणि 128GB पर्यंतची स्टोरेज मिळते. या स्मार्टफोनमध्ये कंपनीने Android 11 आधारित Realme UI 2.0 दिला आहे. हे देखील वाचा: स्वस्तात मस्त Realme C21Y भारतात लाँच; कमी किंमत मिळणार 5,000mAh बॅटरी आणि 4GB रॅम
Realme Narzo 30 5G च्या मागे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. सोबत मॅक्रो आणि ब्लॅक अँड व्हाइट कॅमेरा सेन्सर देण्यात आले आहेत. हा फोन 16 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्यासह येतो. Narzo 30 5G मध्ये 5,000mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.