शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

लाँचपूर्वीच Realme Narzo 30 5G व 4G मॉडेलची किंमत झाली लीक; कमी किंमतीत मिळतील दमदार फीचर्स 

By सिद्धेश जाधव | Published: June 22, 2021 12:14 PM

Realme Narzo 30 4G आणि Realme Narzo 30 5G स्मार्टफोन्स 24 जूनला एका ऑनलाईन इव्हेंटच्या माध्यमातून लाँच करण्यात येतील.  

Realme ने येत्या 24 जून रोजी एका लाँच इव्हेंटचे आयोजन केले आहे. या इव्हेंटच्या माध्यमातून कंपनी भारतात रियलमी नारजो 30 सीरिजमध्ये Realme Narzo 30 4G आणि Realme Narzo 30 5G लाँच करणार आहे. त्याचबरोबर कंपनी Realme Buds Q2 देखील लाँच करणार आहे. आज या डिवाइसेसच्या लाँचपूर्वी यांची किंमत ऑनलाईन झाली आहे.  

Realme Narzo 30 सीरिजमधील स्मार्टफोन्सची किंमत 

रियलमी टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार, Realme Narzo 30 चा 4G मॉडेल 4 जीबी रॅमसह दोन स्टोरेज व्हेरिएंट्समध्ये लाँच केला जाईल. तर 5G मॉडेल 6जीबी रॅमच्या एकाच व्हेरिएंटसह बाजारात येईल. 5जी मॉडेलच्या रिटेल बॉक्सवर MSRP 17,990 रुपये असेल, परंतु बाजारात याची किंमत कमी असू शकते, अशी माहिती रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे. रियलमी नारजो 30 सीरिजमधील दोन्ही फोन्स Racing Blue आणि Racing Silver कलरमध्ये लाँच होतील.  

Realme Narzo 30 5G च्या 6GB + 128GB मॉडेलची भारतातील किंमत 15,990 रुपये असू शकते. Realme Narzo 30 4G च्या छोट्या म्हणजे 4GB + 64GB व्हेरिएंटची किंमत 11,999 रुपये तर 4GB + 128GB व्हेरिएंट 12,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. Realme Buds Q2 ची किंमत 2,899 किंवा 2,999 रुपये असू शकते, अशी माहिती एका टिप्सटरने दिली आहे.  

Realme Narzo 30 5G चे स्पेसिफिकेशन्स   

आंतरराष्ट्रीय बाजारात रियलमी नारजो 30 5जी MediaTek Dimensity 700 चिपसेटसह लाँच केला गेला आहे. तसेच, फोनमध्ये 4 GB RAM सह 64 GB आणि 128 GB स्टोरेजचे पर्याय आहेत. या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. रियलमीचा हा स्मार्टफोन Android 11 वर आधारित Realme UI 2.0 वर चालतो.   

Realme Narzo 30 5G स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. तर, मागे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे.    

Realme Narzo 30 4G चे स्पेसिफिकेशन्स   

रियलमी नारजो 30 बद्दल बोलायचे झाले तर, हा फोन 6.5-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेवर लाँच केला गेला आहे. हा डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो G95 गेमिंग प्रोसेसर आणि 900MHz Mali-G76GPU आहे. तसेच, 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन 30वॉट डार्ट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येणाऱ्या 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.   

फोटोग्राफीसाठी या फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 2MP B&W पोर्टेट कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. तसेच, व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी फोनमध्ये 16MP चा सेल्फी शुटर देण्यात आला आहे.    

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान