Realme ने गेल्या आठवड्यात Narzo 30 आणि Narzo 30 5G स्मार्टफोन लाँच केले होते. यातील Realme Narzo 30 चा पहिला फ्लॅश सेल आज दुपारी सुरु होणार आहे. या फोनच्या किंमतीची सुरुवात 12,499 रुपयांपासून होते परंतु अर्ली बर्ड ऑफर अंतर्गत कंपनी यावर 500 रुपयांचा डिस्काउंट देत आहे. हा फोन Flipkart आणि Realme.com वेबसाईटवर तसेच ऑफलाईन रिटेल स्टोर्समधून विकत घेता येईल.
Realme Narzo 30 ची किंमत
Realme Narzo 30 भारतात दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच केला गेला आहे. या फोनच्या 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 12,499 रुपये आहे. तसेच, 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिेएंट 14,499 रुपयांमध्ये मिळेल.
या पहिल्या सेलमध्ये कंपनीकडून काही ऑफर्स देण्यात येत आहेत. Narzo 30 च्या पहिल्या सेलमध्ये 500 रुपयांचा डिस्काउंट देण्यात येत आहे, त्यामुळे Realme Narzo 30 चा छोटा व्हेरिएंट 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल तर मोठ्या स्टोरेज व्हेरिएंटसाठी 13,999 रुपये मोजावे लागतील. तसेच या स्मार्टफोन सोबत ग्राहकांना फ्री Disney+ Hotstar सब्सक्रिप्शन देखील मिळेल. हा फ्लॅश सेल दुपारी 12 वाजता Flipkart आणि Realme.com वेबसाइटवर सुरु होईल.
Realme Narzo 30 4G ची डिजाइन
Realme Narzo 30 4G मध्ये पंच हॉल कॅमेरा कटआउट देण्यात आली आहे. फोनच्या मागे व्हर्टिकल कॅमेरा सेटअप मिळतो. उजवीकडे पावर बटणमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि डावीकडे वॉल्यूम रॉकर आहे. बॅक पॅनलवर रेसिंग डिजाइन पॅटर्नमध्ये रियलमी नारजोचा लोगो देण्यात आला आहे.
Realme Narzo 30 4G चे स्पेसिफिकेशन्स
Realme Narzo 30 4G मध्ये 6.5 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1080×2400 FHD+, आहे. फोनमध्ये मीडियाटेकचा Helio G95 चिपसेट मिळतो. Narzo 30 4G स्मार्टफोन 4GB आणि 6GB रॅमसह 64GB आणि 128GB स्टोरेजसह सादर केला गेला आहे. रियलमीच्या या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी 30W फास्ट चार्ज टेक्नॉलॉजीसह देण्यात आली आहे. या फोनमध्ये Android 11 आधारित Realme UI 2.0 आहे.
फोटोग्राफीसाठी Realme Narzo 30 4G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यात 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. सोबत 2 मेगापिक्सलचा मॅक्रो आणि 2 मेगापिक्सलचा ब्लॅक अँड व्हाइट कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. Narzo 30 4G 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.