शहरं
Join us  
Trending Stories
1
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
2
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
4
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
5
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
6
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
7
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
8
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
9
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: विधानसभेत महिलांचा आवाज बुलंद केव्हा होणार?; महामुंबईत फक्त ८ महिला आमदार
14
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अल्पसंख्याक बहुल मतदारसंघात काय घडले?; १३ पैकी ६ आमदार निवडून आले
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?
19
तुमच्या वाहनासाठी आवडीचा क्रमांक घरबसल्या मिळवा; आरटीओची आजपासून ऑनलाइन सुविधा
20
..त्या काळाची फार आठवण येते; ही निवडणूक आणि राजकारणाचा ‘तो’ जमाना

लो बजेटमध्ये 5G फोन आणेल रियलमी; 24 जूनला भारतात येईल Realme Narzo 30 सीरिज

By सिद्धेश जाधव | Published: June 17, 2021 5:51 PM

Realme Narzo 30 Series launch: 24 जूनला Realme Narzo 30 4G, Narzo 30 5G आणि Smart TV 32 एका ऑनलाईन इव्हेंटच्या माध्यमातून लाँच करण्यात येतील.

Realme नारजो सीरीजच्या भारतातील लाँचची तयारी पूर्ण झाली आहे. हि सीरिज या महिन्यात सादर केली जाईल अशी कंपनीने माहिती दिली होती. या सीरिजमध्ये Realme Narzo 30 आणि Narzo 30 5G असे दोन स्मार्टफोन सादर केले जातील. Narzo 30 इस महीने 24 जून को भारतात 4G आणि 5G कनेक्टिव्हिटीसह लाँच केले जातील, अशी माहिती रियलमी इंडियाचे सीईओ माधव सेठ यांनी आता दिली आहे.  

माधव सेठ व्यतिरिक्त कंपनीने देखील प्रेस रिलीज जारी केली आहे. या प्रेस रिलीजद्वारे माहिती देण्यात आली आहे कि, 24 जूनला Realme Narzo 30 4G, Narzo 30 5G आणि Smart TV 32 एका ऑनलाईन इव्हेंटच्या माध्यमातून लाँच करण्यात येतील. हा इव्हेंट तुम्ही कंपनीच्या सोशल मीडिया चॅनल्सवरून थेट बघू शकता.  

Realme Narzo 30 5G चे स्पेसिफिकेशन्स  

आंतरराष्ट्रीय बाजारात रियलमी नारजो 30 5जी MediaTek Dimensity 700 चिपसेटसह लाँच केला गेला आहे. तसेच, फोनमध्ये 4 GB RAM सह 64 GB आणि 128 GB स्टोरेजचे पर्याय आहेत. या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. रियलमीचा हा स्मार्टफोन Android 11 वर आधारित Realme UI 2.0 वर चालतो.  

Realme Narzo 30 5G स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. तर, मागे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे.   

Realme Narzo 30 4G चे स्पेसिफिकेशन्स  

रियलमी नारजो 30 बद्दल बोलायचे झाले तर, हा फोन 6.5-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेवर लाँच केला गेला आहे. हा डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो G95 गेमिंग प्रोसेसर आणि 900MHz Mali-G76GPU आहे. तसेच, 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन 30वॉट डार्ट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येणाऱ्या 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.  

फोटोग्राफीसाठी या फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 2MP B&W पोर्टेट कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. तसेच, व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी फोनमध्ये 16MP चा सेल्फी शुटर देण्यात आला आहे.   

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड