Realme नं भारतात आपले दोन नवीन 5G स्मार्टफोन मिडरेंज सेगमेंटमध्ये सादर केले आहेत. Realme Narzo 50 Pro 5G आणि Realme Narzo 50 5G मधील प्रो व्हर्जनची माहिती आपण या लेखात घेणार आहोत. हा हँडसेट 8GB रॅम, 90Hz रिफ्रेश रेट, 5000mAh ची बॅटरी आणि Dimensity 920 5G प्रोसेसरसह बाजारात आला आहे. याची सर्वात मोठी खासियत म्हणजे फोनमधील फिंगरप्रिंट सेन्सर हार्ट रेट मॉनिटरचे देखील काम करतो.
Realme Narzo 50 Pro 5G स्पेसिफिकेशन्स
Realme Narzo 50 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 6.4 इंचाचा Super AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 90Hz रिफ्रेश रेट, 360Hz टच सॅम्पलिंग रेट आणि Corning Gorilla Glass 5 ला सपोर्ट करतो. फोनमधील इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर हार्ट रेट देखील मॉनीटर करतो. कंपनीनं MediaTek Dimensity 920 5G प्रोसेसरसह Mali-G68 GPU दिला आहे. यात 8GB पर्यंत रॅम व 5GB व्हर्च्युअल रॅम मिळतो. 128GB पर्यंतची मेमरी देण्यात आली आहे.
Realme Narzo 50 Pro 5G स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. ज्यात 48MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि एक मॅक्रो कॅमेरा मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. Realme Narzo 50 Pro 5G स्मार्टफोनमध्ये यात 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W डार्ट चार्जला सपोर्ट करते. जी फक्त 31 मिनिटांत 50 टक्के चार्ज होते. Realme Narzo 50 Pro 5G स्मार्टफोन अँड्रॉइड 12 वर आधारित realme UI 3.0 वर चालतो.
Realme Narzo 50 Pro 5G किंमत
Realme Narzo 50 Pro 5G स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट भारतात आले आहेत. 6GB रॅम व 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 21,999 रुपये आहे. तर वहीं 8GB रॅम व 128GB स्टोरेजस मॉडेलसाठी 23,999 रुपये मोजावे लागतील. हा हँडसेट 26 मेला अॅमेझॉन आणि रियलमीच्या अधिकृत साईटवर विक्रीसाठी येईल.