रियलमीने आज आपली बजेट Narzo 50 सीरिज भारतात सादर केली आहे. या सिरीज अंतर्गत कंपनीने दोन स्मार्टफोन सादर केले आहेत. हे फोन Narzo 50A आणि Narzo 50i नावाने बाजारात उपलब्ध होतील. या लेखात आपण Realme Narzo 50A ची माहिती घेणार आहोत. हा डिवाइस MediaTek Helio G88 चिपसेट, 50MP कॅमेरा आणि 6,000mAh च्या बॅटरीसह सादर करण्यात आला आहे.
Realme Narzo 50A चे स्पेसिफिकेशन्स
Realme Narzo 50A मध्ये 6.5-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 720 x 1600 पिक्सल रेजोल्यूशन आणि 570nits ब्राईटनेसला सपोर्ट करतो. डिवाइसमध्ये MediaTek Helio G85 SoC सोबत माली-G52 GPU देण्यात आला आहे. हा फोन 4GB रॅम आणि 128GB पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजसह विकत घेता येईल. ही स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड सपोर्ट देखील फोनमध्ये देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित Realme UI 2.0 कस्टम स्किनवर चालेल.
Realme Narzo 50A मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात पीडीएएफ आणि 10X डिजिटल झूमसह 50MP चा प्रायमरी सेन्सर, 2MP ची मॅक्रो लेन्स आणि 2MP ची B&W पोर्ट्रेट लेन्स देण्यात आली आहे. या रियलमी फोनच्या फ्रंटला 8MP चा सेल्फी कॅमेरा आहे. रियर फिंगरप्रिंट सेन्सरसह यात या फोनमध्ये 18W फास्ट-चार्जिंगला सपोर्टसह 6,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
Realme Narzo 50A ची किंमत
Realme Narzo 50A च्या 4GB + 64GB व्हेरिएंटची किंमत 11,499 रुपये ठेवण्यात आली आहे. तर फोनचा 4GB + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 12,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन 7 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या फ्लिपकार्टवर बिग बिलियन डेज 2021 सेलमध्ये खरेदीसाठी उपलब्ध होईल. तसेच फोन कंपनीच्या वेबसाईट आणि ऑफलाइन स्टोर्सवरून विकला जाईल.