Realme ने सप्टेंबरमध्ये आपल्या Narzo 50 series मध्ये दोन फोन सादर केले होते. आता कंपनी या सीरिजचा विस्तार करणार असल्याचे समोर आले आहे. कंपनी नवीन फोन Realme Narzo 50A Prime नावाने सादर केला जाईल. त्याचबरोबर C-series अंतर्गत Realme C35 देखील सादर होणार असल्याची माहिती टिपस्टरने दिली आहे.
Narzo 50A Prime आणि Realme C35 हे दोन्ही फोन मॉडेल नंबर RMX3511 आणि RMX3516 सह बाजारात सादर केले जातील. अशी माहिती टिप्सटर Paras Guglani (@passionategeekz) ने ट्विटरवरून दिली आहे. या दोन फोन्स सोबत अजून एका निनावी Realme फोनचा RMX3521 मॉडेल नंबर समोर आला आहे. उपरोक्त मॉडेल नंबरसह Narzo 50A Prime आणि Realme C35 हे स्मार्टफोन युरोपियन इकोनॉमिक कमीशन (EEC) च्या डेटाबेसमध्ये दिसल्यामुळे हे दोन्ही डिवाइस सर्वप्रथम युरोपमध्ये लाँच होऊ शकतात.
रियलमीचा अल्ट्रा प्रीमियम स्मार्टफोन
सध्या अल्ट्रा प्रीमियम स्मार्टफोन सेगमेंटमध्ये अॅप्पलचा दबदबा आहे. त्याचबरोबर वनप्लस, सॅमसंग आणि विवो देखील या सेगमेंटमध्ये सक्रिय आहेत. आता या बड्या कंपन्यांना Realme आपल्या अल्ट्रा-प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोनने टक्कर देणार आहे. हा फोन 800 अमेरिकन डॉलर (जवळपास 60,000 रुपये) पेक्षा जास्त किंमतीत सादर करू शकते. रियलमीचे संस्थापक आणि सीईओ स्काय ली यांनी कंपनी अल्ट्रा-प्रीमियम स्मार्टफोन सेगमेंटमध्ये पदार्पण करणार असल्याचे सांगितले आहे.