Apple मोबाईल मार्केटमध्ये ट्रेंड सेट करते आणि त्या ट्रेंडचं अनुकरण अँड्रॉइड स्मार्टफोन कंपन्या करतात. कंपनी गेल्या दोन वर्षांपासून iPhone च्या बॉक्समध्ये चार्जर देत नाही. हा ट्रेंड देखील अँड्रॉइड कंपन्यांमध्ये दिसू लागला आहे. सॅमसंगनं आपल्या प्रीमियम स्मार्टफोन्सच्या बॉक्समध्ये चार्जर देणं बंद केलं आहे. शाओमीनं देखील काही फोन्सच्या बॉक्समध्ये चार्जर ऑप्शनल ठेवला आहे. आता Realme आपल्या आगामी बजेट स्मार्टफोन सोबत चार्जर देणार नाही.
रियलमी इंडियाच्या कम्युनिटी वेबसाईटवरील पोस्टनुसार, भारतात येत असलेल्या Realme Narzo 50A Prime स्मार्टफोनच्या बॉक्समध्ये फोन चार्जर मिळणार नाही. रियलमीच्या आगामी सर्व फोन्ससोबत चार्जर मिळणार नाही असं दिसत आहे. कारण 2025 पर्यंत रियलमीला झिरो कार्बन एमीशन कंपनी बनायचं आहे. त्यामुळेच कंपनीनं रियलमी नारजो 50ए प्राइमच्या बॉक्समध्ये चार्जर न देण्याचा निर्णय घेतला आहे.
Realme Narzo 50A Prime चे स्पेसिफिकेशन्स
या रियलमी फोनमध्ये 6.6 इंचाचा फुलएचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले मिळतो. जो 600निट्स पोक ब्राईटनेसला सपोर्ट करतो. कंपनीनं हा फोन अँड्रॉइड 11 ओएस बेस्ट रियलमी युआय आर एडिशनसह सादर केला आहे. यात ऑक्टाकोर प्रोसेसरसह Unisoc T612 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत 4 जीबी रॅम आणि 128 जीबी पर्यांतची इंटरनल मेमरी मिळते.
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलचा ब्लॅक अँड व्हाईड सेन्सर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. फ्रंटला 8 मेगापिक्सलचा सेन्सर आहे. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी साईड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. तर पावर बॅकअपसाठी 5,000एमएएच बॅटरी 18वॉट फास्ट चार्जिंगसह मिळते.