Realme नं आपल्या नारजो सीरीजमध्ये Realme Narzo 50i Prime स्मार्टफोनची भर टाकली आहे. कंपनीनं या फोनची किंमत अत्यंत कमी ठेवली आहे. तरीही यात 4GB RAM, UniSoC T612 प्रोसेसर आणि 5000mAh battery असे स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. Android Go Edition वर चालणारा हा फोन सध्या चीनमध्ये सादर करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया या फोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीची माहिती.
Realme Narzo 50i Prime चे स्पेसिफिकेशन्स
Realme Narzo 50i Prime अँड्रॉइड 11 ओएसच्या ‘गो एडिशन’ वर लाँच करण्यात आला आहे. त्यामुळे या स्मार्टफोनला कमी रॅम आणि स्टोरेज देखील पुरेशी ठरते. स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरसह Unisoc T612 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत ग्राफिक्ससाठी माली जी52 जीपीयू देखील मिळतो. फोनमध्ये 4 जीबी पर्यंत रॅम आणि 64 जीबी पर्यंतची मेमरी देण्यात आली आहे. जी मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं वाढवता येते.
रियलमी नारजो 50आय प्राईममध्ये 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या ड्युअल सिम 4जी फोनमध्ये बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स आहेत. फोटोग्राफीसाठी 8 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे जो 4एक्स डिजिटल झूमला सपोर्ट करतो. तर फ्रंटला 5 मेगापिक्सलचा सेल्फी शुटर आहे. पावर बॅकअपसाठी 5,000एमएएच बॅटरी 10वॉट फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे. सिंगल चार्जमध्ये हा फोन 36 दिवसांचा स्टँडबाय टाइम देऊ शकतो, असा दावा कंपनीनं केला आहे.
Realme Narzo 50i Prime ची किंमत
रियलमी नारजो 50आय प्राईमच्या 3 जीबी रॅम 32 जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत चीनमध्ये 100 डॉलर्स अर्थात 7,850 रुपयांच्या आसपास ठेवण्यात आली आहे. तर 4GB RAM व 64GB Storage असलेला मॉडेल 110 डॉलर्स (जवळपास 8,600 रुपये) मध्ये विकत घेता येईल. फोनच्या भारतीय लाँचची माहिती मात्र मिळाली नाही.