Realme लवकरच आपली बजेट नारजो 50 सीरिज भारतात सादर करणार आहे. ही सीरिज यावर्षी सादर झालेल्या Narzo 30 सीरिजची जागा घेणार आहे. नव्या सीरिजमध्ये Narzo 50, Narzo 50A, Narzo 50i आणि Narzo 50 Pro हे स्मार्टफोन्स सादर केले जाऊ शकतात. हा लाँच इव्हेंट 24 सप्टेंबरला आयोजित करण्यात आला आहे. Narzo 50 सीरीजसह कंपनी Smart TV Neo आणि Realme Band 2 हे प्रोडक्ट भारतात सादर करू शकते. आता लाँचपूर्वी 91मोबाईल्सने Narzo 50i स्मार्टफोनचे रेंडर शेयर केले आहेत, त्यामुळे या फोनच्या डिजाईनची माहिती मिळाली आहे.
Realme Narzo 50i ची डिजाइन
Realme Narzo 50i रेंडर लाईट ग्रीन रंगाचा आहे, त्यामुळे या कलर व्हेरिएंटसह हा फोन सादर केला जाऊ शकतो. तसेच स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर आयताकृती कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअपमध्ये सिंगल कॅमेरा सेन्सर आणि LED फ्लॅश दिसत आहे. तसेच कॅमेरा सेन्सरच्या खालच्या बाजूस LED फ्लॅश देण्यात आला आहे. तसेच बॅक पॅनलमध्ये स्पिकर देखील दिसत आहे.
हा स्मार्टफोन ड्युअल टेक्सचर डिजाईनसह सादर केला जाईल. फोनच्या ग्रीपसाठी बॅक पॅनलवर वेगळा पॅटर्न आहे आणि टॉपला स्मूद पॅनल दिसत आहे. फोनच्या उजवीकडील पॅनलवर वॉल्यूम रॉकर देण्यात आले आहेत. बॉटम पॅनल 3.5mm ऑडियो जॅकसह येईल.
Realme Narzo 50i स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मात्र समोर आली नाही. परंतु हा फोन फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध होईल. तसेच यात MediaTek चिपसेट, HD+ डिस्प्ले आणि Android 11 ऑपरेटिंग सिस्टम मिळू शकते.