Realme नं आज भारतात आपल्या प्रोडक्ट्सचा पेटारा उघडला आहे. कंपनीनं पाच डिवाइस एका लाँच इव्हेंटमधून सादर करून प्रत्येक सेगमेंटच्या ग्राहकांना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे. एकीकडे 150W फास्ट चार्जिंगसह Realme GT Neo3 नं प्रीमियम सेगमेंटमध्ये एंट्री घेतली आहे. तर Realme Pad Mini टॅबलेट बजेट सेगमेंटमध्ये शानदार फीचर्ससह उतरवण्यात आला आहे.
Realme Pad Mini ची किंमत
Realme Pad Mini टॅबलेटचे तीन व्हेरिएंट भारतात दाखल झाली आहेत. यांची विक्री येत्या 2 मेला दुपारी 12 वाजल्यापासून केली जाईल. हा टॅब ग्रे आणि ब्लू कलरमध्ये विकत घेता येईल. यावर मर्यादित कालावधीसाठी 2000 रुपयांचा डिस्काउंट देखील दिला जाईल.
- Realme Pad Mini (Wifi Only) 3GB/32GB: 10,999 रुपये
- Realme Pad Mini (Wifi Only) 4GB/64GB: 12,999 रुपये
- Realme Pad Mini (LTE) 3GB/32GB: 12,999 रुपये
- Realme Pad Mini (LTE) 4GB/64GB: 14,999 रुपये
Realme Pad Mini चे स्पेसिफिकेशन्स
Realme Pad Mini मध्ये 8.7-इंचाचा WUXGA+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 1340 x 800 पिक्सल रेजलूशनला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी कंपनीनं Unisoc T616 प्रोसेसरचा वापर केला आहे. ग्राफिक्ससाठी Mali-G57 GPU देण्यात आला आहे. सोबत 4GB पर्यंत RAM आणि 64GB पर्यंतची स्टोरेज मिळते. हा डिवाइस अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.
फोटोग्राफीसाठी या छोट्या टॅबमध्ये दोनच कॅमेरे मिळतात. त्यातील 8MP चा सेन्सर कंपनी टॅबच्या मागच्या बाजूस दिला आहे. तर फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5MP चा सेन्सर मिळतो. या टॅबलेटमध्ये 6400mAh मोठी बॅटरी मिळते, जी 18W फास्ट चार्जिंग स्पिडनं चार्ज करता येते. याचे वजन 372 ग्राम आहे.