रियलमीने आज चीनमध्ये आयोजित केलेल्या इव्हेंटमधून दोन स्मार्टफोन सादर केले आहेत. कंपनीने मिडरेंजमध्ये Realme Q3s आणि Realme GT Neo 2T हे दोन फोन सादर केले आहेत. यातील Realme Q3 स्मार्टफोनची किंमत 20 हजार भारतीय रुपयांपेक्षा कमी आहे. हा फोन 144Hz रिफ्रेश रेट, स्नॅपड्रॅगन 778G चिपसेट, 48MP कॅमेरा आणि 30W फास्ट चार्जिंगसह बाजारात आला आहे.
Realme Q3s ची किंमत
चीनमध्ये Realme Q3s चे तीन व्हेरिएंट कंपनीने सादर केले आहेत. यातील सर्वात चोयात 6GB रॅम 128GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 1,599 युआन (जवळपास 18,700 रुपये) आहे. तर 8GB/128GB मॉडेलची किंमत 1,799 युआन (जवळपास 21,000 रुपये) आणि 8GB/256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 2,199 युआन (जवळपास 25,700 रुपये) ठेवण्यात आली आहे. हा भारतात कधी येईल याची माहिती कंपनीने दिली नाही.
Realme Q3s चे स्पेसिफिकेशन्स
Realme Q3s मध्ये 6.6-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एलसीडी डिस्प्ले 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. कंपनीने यात क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 778G चिपसेटचा वापर केला आहे. या फोनमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. सोबत 5GB एक्सटेंडेड रॅम मिळतो. हा फोन Android 11 सह RealmeUI 2.0 वर चालतो.
Realme Q3s मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 48MP चा प्रायमरी सेन्सर, एक ब्लॅक अँड व्हाइट पोर्ट्रेट कॅमेरा आणि एक मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. फोनमध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स देण्यात आले आहेत. स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आहे जी 30W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.