Realme नं आज चीनमध्ये आपले दोन नवीन स्मार्टफोन सादर केले आहेत, ज्यांची नावं Realme Q5 आणि Realme Q5 Pro अशी आहेत. यातील वॅनिला व्हर्जनमध्ये कंपनीनं 8GB RAM, Snapdragon 695 5G चिपसेट आणि 60W फास्ट चार्जिंग दिली आहे. हा फोन बजेट सेगमेंटमध्ये शाओमी आणि सॅमसंगला चांगलीच टक्कर देऊ शकतो.
Realme Q5 चे स्पेसिफिकेशन्स
रियलमी क्यू5 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलची ब्लॅक अँड व्हाईट लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. फ्रंटला 16 मेगापिक्सलचा सेल्फी शुटर मिळतो. रियलमी क्यू5 स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एलसीडी पॅनल 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.
Realme Q5 अँड्रॉइड 12 ओएस आधारित रियलमी युआय 3.0 वर चालतो. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी एड्रेनो 619 जीपीयू मिळतो. यातील वर्चुअल रॅम फिचर 5 जीबी रॅमवाढवू शकतं. फोनच्या साईड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर आहे. पावर बॅकअपसाठी रियलमी क्यू5 मध्ये 5,000एमएएचची मोठी बॅटरी 60वॉट फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे.
Realme Q5 ची किंमत
रियलमी क्यू5 च्या 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज मॉडेलची किंमत 1399 युआन (जवळपास 16,500 रुपये) आहे. तर 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेजसाठी 1599 युआन (जवळपास 19,000 रुपये) मोजावे लागतील. 8 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेजची किंमत 1799 युआन (जवळपास 21,500) रुपये आहे.