SpO2 सेन्सर, स्ट्रेस मॉनिटर, स्लिप मॉनिटर, ब्लूटूथ कॉलिंग आणि IP68 सर्टिफिकेशनसह Realme TechLife Watch 100 स्मार्टवॉच सादर करण्यात आलं आहे. रियलमीच्या सब-ब्रँड अंतर्गत आलेल्या या घड्याळाची आजपासून विक्री सुरु होणार आहे. या पहिल्याच सेलमध्ये या डिवाइसची विक्री डिस्काउंटसह केली जाणार आहे.
Realme TechLife Watch 100 ची विक्री कंपनीच्या वेबसाईट व्यतिरिक्त फ्लिपकार्ट आणि रिटेल स्टोर्सवरून सुरु होईल. हा घड्याळाची किंमत 3,999 रुपये ठेवण्यात आली आहे. परंतु फ्लिपकार्टवर 500 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. कंपनीच्या वेबसाईटवर देखील 300 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट आणि 200 रुपयांचा कुपन डिस्काउंट मिळेल.
Realme TechLife Watch R100 चे स्पेसिफिकेशन्स
वॉचच्या कडा अॅल्यूमीनियमच्या आहेत, तर स्ट्रॅप सिलिकॉनचे आहेत. रियलमी टेकलाइफ वॉच आर100 मध्ये 1.32 इंचाचा वर्तुळाकार डिस्प्ले 360×360 पिक्सल रिजोल्यूशनसह देण्यात आला आहे. जो 450nits पीक ब्राईटनेसला सपोर्ट करतो. यातील 100 पेक्षा जास्त वॉच फेस युजर्सना कस्टमाइज लूक देण्यास मदत करतात.
वॉचमधील 380mAh ची आहे, जी सिंगल चार्जवर 7 दिवसांचा यूसेज देते, असा दावा कंपनीनं केला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी वॉचमध्ये Bluetooth v5.2 देण्यात आलं आहे. वॉच IP68 रेटिंगसह येतं, त्यामुळे धूळ आणि पाण्यापासून हे सुरक्षित राहतं.
हे वॉच 100 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड डिटेक्ट करू शकतं. त्याचबरोबर हार्ट रेट मॉनिटरिंग सेन्सर, ब्लड ऑक्सीजन सेन्सर, स्ट्रेस मॉनिटरिंग सेन्सर, स्लिप मॉनिटरिंग सेन्सर, वॉटर रिमाइंडर आणि फीमेल हेल्थ ट्रॅकिंग असे हेल्थ फीचर्सही मिळतात. हा डेटा Realme Wear अॅपच्या माध्यमातून स्मार्टफोनवर मिळतो.
तसेच या वॉचमध्ये कॉल, एसएमएस आणि थर्ड पार्टी अॅप नोटिफिकेशन असे फीचर्स देखील मिळतात. यात डायल पॅड, इव्हेंट रिमाइंडर, ब्रेथ ट्रेनिंग, वेदर फोरकास्ट, स्टॉपवॉच, टाइमर, अलार्म इत्यादी स्मार्टवॉच फिचर देखील आहेत.