रियलमी अँड्रॉइड स्मार्टफोन्ससाठी Realme MagDart वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजी सादर केली आहे. Realme MagDart अगदी Apple च्या MagSafe प्रमाणे चालते, परंतु चार्जिंग स्पीडच्या बाबतीत रियलमीने अॅप्पलला मात दिली आहे. कंपनीने या टेक्नॉलॉजीवर चालणाऱ्या अॅक्सेसरीज देखील सादर केल्या आहेत. यात 50W आणि 15W च्या MagDart Charger तसेच MagDart Power Bank चा समावेश करण्यात आला आहे. परंतु या टेक्नॉलॉजीला सपोर्ट करणारा पहिला स्मार्टफोन Realme Flash अजूनतरी कॉन्सेप्ट लेव्हलला आहे.
रियलमीने सादर केलेल्या MagDart मॅग्नेटिक चार्जिंग टेक्नॉलॉजीमध्ये चार्जर चुंबकाच्या मदतीने स्मार्टफोनच्या मागे चिकटतो आणि चार्जिंग सुरु होते. अशी टेक्नॉलॉजी टेक दिग्गज अॅप्पलने गेल्यावर्षी सादर केली होती, परंतु अॅप्पलचा मॅगसेफ चार्जर फक्त 15W चार्जिंग स्पीडला सपोर्ट करतो. याउलट रियलमीची मॅगडार्ट टेक्नॉलॉजी 50W पर्यंतच्या चार्जिंग स्पीडला सपोर्ट करते.
या टेक्नॉलॉजी सोबत कंपनीने 50W MagDart Wireless Charger, 15W MagDart Charger आणि MagDart Power Bank अश्या अॅक्सेसरीज सादर केल्या आहेत. नावाप्रमाणे 50 वॉट मॅगडार्ट चार्जरचा चार्जिंग स्पीड 50 वॉट आहे तर 15 मॅगडार्ट चार्जरचा वेग 15W आहे. मॅगडार्ट डिक्नोलॉजीसह एक पावर बँक देखील कंपनीने सादर केली आहे, जिला MagDart Power Bank असे नाव देण्यात आले आहे. त्याचबरोबर Realme GT साठी कंपनीने MagDart Wallet, MagDart Beauty Light आणि MagDart case अश्या अॅक्सेसरीज देखील लाँच केल्या आहेत.