Realme V60 Pro Launched: देशातील आघाडीची स्मार्टफोन कंपनी Realme ने V सीरीजमध्ये आपला नवीन बजेट 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Realme V60 Pro, असे या स्मार्टफोनचे नाव असून, यात हा 24GB रॅम आणि 250GB स्टोरेज ऑप्शनसह येतो. कंपनीने यात 5600mAh ची तगडी बॅटरी दिली आहे, जी 45W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
2 वर्षांची वॉरंटीमिळालेल्या माहितीनुसार, या फोनमध्ये 12GB RAM हार्डवेअर + 12GB व्हर्च्युअल रॅम आहे. या फोनवर ग्राहकांना एक वर्षाची वॉटरप्रूफ वॉरंटी + दोन वर्षांची फोन वॉरंटी मिळते. हा फोन ऑब्सिडियन गोल्ड, रॉक ब्लॅक आणि लकी रेड, अशा तीन रंगांमध्ये येतो. फोनच्या 12GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 1599 युआन (अंदाजे रु. 18,675) आहे, तर टॉप व्हेरिएंट 12GB + 512GB ची किंमत 1799 युआन (अंदाजे रु. 21,015) आहे.
Realme च्या या फोनमध्ये 6.67-इंचाची HD+ 120Hz LCD स्क्रीन मिळेल. हा फोन नवीन MediaTek Dimensity 6300 SoC प्रोसेसरसह येतो. फोनला धूळ आणि पाण्यापासून संरक्षण देण्यासाठी IP68 + IP69 रेटिंग मिळाले आहे. फोनमध्ये मिलिटरी-ग्रेड ड्रॉप रेझिस्टन्स आहे. V60 Pro मध्ये 5600mAh बॅटरी मिळेल, जी 45W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
हा फोन Android 14 वर आधारित Realme UI 5.0 वर चालतो. तसेच, फोटोग्राफीसाठी या Realme V60 Pro मध्ये 50MP रियर कॅमेरा, LED फ्लॅश आणि 8MP फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि अल्ट्रा लिनियर स्पीकर मिळेल. महत्वाची गोष्ट म्हणजे, सध्या हा फोन चीनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. भारतात कधी लॉन्च होणार, याबाबत कुठलीही माहिती नाही.