शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
4
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
5
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: नांदेड पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसचा विजय; रविंद्र चव्हाण यांचा १४५७ मतांनी विजय
7
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
8
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
9
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
10
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
11
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
12
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
13
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
14
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
15
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
16
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
17
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
18
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"

23 जुलैला भारतात येणार Realme Watch 2 Pro; असे असतील स्पेसिफिकेशन्स 

By सिद्धेश जाधव | Published: July 15, 2021 3:31 PM

Realme Watch 2 Pro अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून भारतात खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. 23 जुलैला दुपारी 12.30 वाजता लाँच हा स्मार्टवॉच लाँच केला जाईल. 

Realme Watch 2 Pro स्मार्टवॉच लवकरच भारतात सादर केला जाणार आहे. हा स्मार्टवॉच 23 जुलै रोजी Amazon वर खरेदीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. अमेझॉनवर रियलमी वॉच 2 प्रोचे प्रॉडक्ट पेज लाईव्ह करण्यात आले आहे. या प्रॉडक्ट पेजनुसार या स्मार्टवॉचमध्ये 1.75 इंचाचा कलर डिस्प्ले देण्यात आला आहे. यातील 390mAh ची बॅटरी सिंगल चार्जवर 24 तास हार्ट रेट मॉनिटरिंगसह 14 दिवसांचा बॅकअप देऊ शकते.  

Realme Watch 2 Pro यापूर्वी मलेशियात लाँच झाला आहे. तिथे याची किंमत MYR 299 (सुमारे 5,400 रुपये) आहे. हा स्मार्टवॉच मेटॅलिक सिल्वर आणि स्पेस ग्रे कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल. आशा आहे कि भारतात देखील या रियलमी स्मार्टवॉचची किंमत हीच असेल.  

Realme Watch 2 Pro चे स्पेसिफिकेशन्स 

Realme Watch 2 Pro मध्ये 1.75 इंचाचा आयताकृती टच डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 320x320 पिक्सल रिजोल्यूशन आणि 600 निट्स ब्राईटनेसला सपोर्ट करतो. या रियलमी वॉचमध्ये 390mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी एकदा फुल चार्ज केल्यावर 24 तास हार्ट रेट मॉनिटरिंगसह 14 दिवस वापरता येतो.  

यात इन-बिल्ट हार्ट रेट सेन्सर आणि 90 स्पोर्ट्स मोड सह थ्री-अ‍ॅक्सिस एक्सेलेरोमीटर आहे. तसेच हा स्मार्टवॉच IP68 डस्ट अँड वॉटर रसिस्टेंट आहे. Realme Watch 2 Pro मध्ये हार्ट रेट, एक्सरसाइज हार्ट रेट, ब्लड ऑक्सिजन लेव्हल, स्लिप डिटेक्शन इत्यादी फीचर्स देण्यात आला आहे. यात बास्केटबॉल, आउटडोर रनिंग, योगा, क्रिकेट, फुटबॉल, स्ट्रेंथ ट्रेनिंग असे अनेक स्पोर्ट्स मोड मिळतात.  

टॅग्स :realmeरियलमीamazonअ‍ॅमेझॉनtechnologyतंत्रज्ञान