सिम कार्ड म्हणजे मोबाईलचा आत्मा आहे, असे जर म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. आता जरी स्मार्टफोन्समध्ये वायफाय कनेक्टिव्हिटी आली असली तरी फिचर फोन अजूनही कनेक्टिव्हिटीसाठी सिम कार्डवर अवलंबून आहेत. ई-सिम टेक्नॉलॉजी पाहता भविष्यात सिम कार्ड्स अस्तित्वात देखील राहणार नाहीत. परंतु सध्याचे सिम पाहताना तुम्हाला कधी तरी प्रश्न पडला असेल कि, सिम कार्डचा एक कोपरा का कापलेला असतो? आज आपण यामागील जाणून घेणार आहोत.
सिम कार्डचे भविष्य आणि भूतकाळ अगदी सारखाच आहे. सुरवातीला सिम कार्ड फोन्समध्ये बिल्ट इन मिळायचे. ज्या टेलिकॉम ऑपरेटरचा सिम घेतले जायचे त्याच्याकडूनच हँडसेट घ्यावा लागायचा. त्यामुळे फोनमधून सिम काढणे शक्यच नव्हते. जर तुम्हाला नेटवर्क बदलायचे असेल तर संपूर्ण फोन बदलावा लागायचा.
कालांतराने सिम कार्डमध्ये बदल झाला. सिम कार्ड काढता आणि पुन्हा इन्सर्ट करता येतील असे फोन्स बाजारात येऊ लागले. युजर्स सिम फोनमधून काढून बदलू शकत होते. परंतु तेव्हा सिम कार्डचा कोपरा कापला जात नव्हता. याचा दुष्परिणाम असा होत असे कि, सिम कार्ड योग्यरीत्या इन्सर्ट करता आणि काढता येत नव्हते. सममितीय आकारामुळे योग्य आणि अयोग्य बाजूमध्ये गोंधळ व्हायचा.
यामुळे सिम कार्डची डिजाइन बदलण्याचे ठरले. फोनमधील कनेक्टर्ससोबत नीट कनेक्शन व्हावे म्हणून सिम कार्डचा आकार बदलण्यात आला. यावर उपाय म्हणून सिम कार्डचा एक कोपरा कापण्यात आला. त्यामुळे आता सिम कार्ड इन्सर्ट करताना कोणतीही समस्या येत नाही आणि फोन मधील पिन्स सोबत सिम कार्डचे योग्य कनेक्शन होते. तुम्हाला माहित होतं का हे कारण?