नवी दिल्ली: भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) या टेलिकॉम कंपनीच्या प्रीपेड मोबाइल वापरणाऱ्या लाखो ग्राहकांना पुन्हा एकदा कंपनीने झटका दिला आहे. तुम्ही जर BSNL चे ग्राहक असाल तर तुम्हाला ७ दिवसात रिर्चाज करावा लागणार आहे. ग्राहकांनी रिर्चाज न केल्यास इनकमिंग व आउटगोइंग सेवा बंद करण्यात येईल. त्याचप्रमाणे मोबाइलचा असलेला बॅलेन्सदेखील झीरो होणार आहे. याआधी कंपनीकडून १५ दिवासांची मुदत देण्यात येत होती. तसेच रिर्चाज केल्यानंतर मोबाइल मध्ये असणारा बॅलेन्सदेखील ऍड करुन ग्राहकांना मिळायचा. परंतु आता कंपनीने ही सेवा बंद करण्याचे ठरवले असून आता ही मुदत १५ दिवसांएवजी फक्त ७ दिवसांची करण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रीपेड ग्राहकांना ७ दिवसातच मोबाइलची मुदत वाढवण्यासाठी पुन्हा रिर्चाज करावा लागणार आहे व असे न केल्यास मोबाइलमधला शिल्लक असलेला बॅलेन्स देखील झिरो होईल. सध्या BSNL कंपनीला खूप मोठा तोटा सहन करायला लागतो आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्याचे पाउल कंपनीने उचलल्याचे समजते.
'सातच्या आत' रिचार्ज; अन्यथा तुमचा मोबाईल बॅलन्स शून्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 7:08 PM