रेडमीचा आगामी स्वस्त स्मार्टफोन Redmi 10 2022 लवकरच लाँच होणार आहे. आता हा फोन Google Play Console वर लिस्ट झाला आहे. या लिस्टिंगमधून या फोनच्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. हा फोन दोन रॅम व्हेरिएंटसह बाजारात येईल, तसेच यात अँड्रॉइड 11 आणि मीडियाटेकचा प्रोसेसर मिळणार आहे.
Redmi 10 2022 चे स्पेसिफिकेशन्स
टिपस्टर मुकुल शर्मानं दिलेल्या माहितीनुसार, Redmi 10 2022 स्मार्टफोन Android 11 आधारित MIUI 12.5 वर चालेल. तसेच यात 1080×2400 पिक्सल रिजोल्यूशन असलेला FHD+ डिस्प्ले देण्यात येईल. गुगल प्ले लिस्टिंगनुसार यात MediaTek Helio G80 सीरिजमधील चिपसेटसह बाजारात येईल. तर FCC (फेडरल कॉम्यूनिकेशन्स कमिशन) सर्टिफिकेशन वेबसाईटवर या फोनचे दोन व्हेरिएंट लिस्ट करण्यात आले आहेत. ज्यात 4GB रॅम + 64GB स्टोरेज आणि 6GB रॅम + 128GB स्टोरेजचा समावेश असेल.
याआधी आलेल्या लिक्सनुसार आगामी Redmi 10 2022 स्मार्टफोनमध्ये बॅक पॅनलवर 50MP प्रेमवारी कॅमेरा मिळेल. हा एक Samsung S5KJN1 किंवा OmniVision OV50C40 सेन्सर असू शकतो. त्याचबरोबर फोनमध्ये 8MP Sony IMX355 अल्ट्रा-वाईड कॅमेरा आणि 2MP OmniVision OV02B1B किंवा GC02M1B मॅक्रो सेन्सर मिळेल. Redmi 10 Prime 2022 स्मार्टफोन भारतात 2022 च्या पहिल्या तिमाहीत अर्थात जानेवारी ते मार्च दरम्यान सादर केला जाऊ शकतो.
हे देखील वाचा:
फक्त YouTube नव्हे तर ‘हे’ 5 सोशल मीडिया अॅप्स देखील देत आहेत कमाईची संधी
3 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह iQOO चा 5G Phone उपलब्ध; एकापेक्षा एक स्मार्टफोन्स मिळतायत स्वस्तात