शहरं
Join us  
Trending Stories
1
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
2
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमानात
4
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
5
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
6
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
7
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
8
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
9
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
10
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
11
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
12
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
13
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
14
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
15
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
16
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
17
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
18
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
19
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
20
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल

आतापर्यंतचा सर्वात हलका Xiaomi स्मार्टफोन भारतात लाँच; 6000mAh ची बॅटरीसह Redmi 10 Prime बाजारात दाखल  

By सिद्धेश जाधव | Published: September 03, 2021 2:41 PM

Redmi 10 Prime Price: Redmi 10 Prime चे दोन व्हेरिएंट भारतात सादर करण्यात आला आहे. हा फोन Amazon, Mi.com आणि Mi Home स्टोर्सवरून 7 सप्टेंबर दुपारी 12 वाजल्यापासून विकत घेता येईल.  

ठळक मुद्देहा फोन Amazon, Mi.com आणि Mi Home स्टोर्सवरून 7 सप्टेंबर दुपारी 12 वाजल्यापासून विकत घेता येईल.   या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G88 SoC आहे. हा फोन 2GB एक्सपांडेबल रॅमला सपोर्ट करतो.

Xiaomi ने आज भारतात आपला बहुप्रतीक्षित बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. ठरल्याप्रमाणे आज कंपनीने Redmi 10 Prime देशात सादर केला आहे. लाँच पूर्वी सांगितल्याप्रमाणे या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G88 चिपसेट देण्यात आला आहे. हा गेमिंग चिपसेट मीडियाटेकने काही दिवसांपूर्वी बाजारात सादर केला होता. त्याचबरोबर रेडमी 10 प्राइम स्मार्टफोनमध्ये 6,000 एमएएच बॅटरी, 50MP कॅमेरा असे भन्नाट स्पेसिफिकेशन देण्यात आले आहेत.  (Redmi 10 Prime launched in India with 6000mAh battery at Rs 12,499)

Redmi 10 Prime ची किंमत 

Redmi 10 Prime चे दोन व्हेरिएंट भारतात सादर करण्यात आला आहे. या फोनचा 4GB RAM आणि 64GB स्टोरेज असलेला छोटा मॉडेल 12,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 6GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 14,499 रुपये मोजावे लागतील. Redmi 10 Prime व्हाइट, ब्लॅक आणि ब्लू कलरमध्ये उपलब्ध होईल. हा फोन Amazon, Mi.com आणि Mi Home स्टोर्सवरून 7 सप्टेंबर दुपारी 12 वाजल्यापासून विकत घेता येईल.  

Redmi 10 Prime चे स्पेसिफिकेशन्स  

Xiaomi Redmi 10 Prime स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. पंच होल कट-आऊटसह येणार हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट आणि 20:9 अस्पेक्ट रेशियोला सपोर्ट करतो. या डिस्प्लेला गोरिल्ला ग्लास 3 ची सुरक्षा देण्यात आली आहे. सिक्योरिटीसाठी यात उजव्या पॅनलवर पावर बटनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तसेच यात ड्युअल 4G VoLTE, Wi-Fi 5, Bluetooth 5.0, GPS, IR blaster, Qj 3.5mm ऑडियो जॅक असे कनेक्टिव्हिटी ऑप्शन देण्यात आले आहेत.    

या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G88 SoC आहे. या रेडमी फोनमध्ये 6GB पर्यंतचा LPDDR4x RAM आणि 128GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन 2GB एक्सपांडेबल रॅमला सपोर्ट करतो. हा बजेट स्मार्टफोन Android 11 ऑपरेटिंग सिस्टम आधारित MIUI 12.5 वर चालतो. Redmi 10 Prime चा आकार 161.95 X 75.57 X 9.56 मिमी आणि वजन 192 ग्राम आहे. 

Xiaomi Redmi 10 Prime 10 मध्ये कंपनीने क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे, त्याचबरोबर 8-मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड लेन्स, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर कॅमेरा मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. या रेडमी फोनमधील 6,000mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंग आणि 9W रिवर्स वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करते.  

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड