Redmi 10 Series भारतात लाँच होण्यासाठी तयार आहे. ही सीरिज लवकरच देशात लाँच केली जाऊ शकते. Redmi India ने आपल्या अधिकृत ट्विटर अकॉउंटवरून एक एक ट्वीट केले आहे. यात Brace yourselves for the #RedmiRevolution! असे लिहण्यात आले आहे. लवकरच कंपनी रेडमी 10 सीरिज लाँच करू शकते, असा अंदाज या ट्विटवरून वर्तवण्यात येत आहे. (Redmi 10 series India launch officially teased)
या ट्वीटमध्ये लाँचचा कोणताही उल्लेख करण्यात आला नाही, परंतु #10on10 चा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे Redmi 10 Series च्या चर्चेला उधाण आले आहे. कंपनी यापूर्वी भारतात Redmi Note 10 सीरीजमध्ये Redmi Note 10, Note 10S, Note 10 Pro आणि Note 10 Pro Max असे स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. आता Redmi 10 सीरीजमधील स्वस्त स्मार्टफोन्स लाँच करू शकते. Redmi 10 सीरीजचे काही फोन्स EVOL डिजाइनसह येऊ शकतात.
सीरिजमधील फोन्सची किंमत पाहता Redmi 10 सीरीजची किंमत भारतात 10,000 रुपयांच्या आत असू शकते. कारण Note Series चे फोन्स 10,000-20,000 रुपयांच्या सेगमेंटमध्ये येतात. अधिकृतपणे टीज झाल्यानंतर अंदाज लावला जात आहे कि रेडमी 10 सीरीज जुलैच्या सुरुवातीला लाँच केली जाऊ शकते.