Xiaomi नं काही दिवसांपूर्वी आपला बजेट स्मार्टफोन Redmi 10 लाँच केला होता. आज या स्मार्टफोनचा पहिला सेल आहे. हा फोन 6000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा, 8GB रॅम आणि Snapdragon 680 चिपसेटसह भारतात आला आहे. या फोनची किंमत 10,999 रुपयांपासून सुरु होते. परंतु तुम्ही या सेलमध्ये हा फोन 1 हजार रुपयांच्या इन्स्टंट डिस्काउंटसह विकत घेऊ शकता.
Redmi 10 2022 ची किंमत
Redmi 10 2022 स्मार्टफोनचा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज मॉडेल 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 12,999 रुपये देऊन 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट मिळेल. हा फोन Blue आणि Black कलरमध्ये विकत घेता येईल. HDFC बँकेच्या क्रेडिट कार्ड किंवा ICICI बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डनं पेमेंट केल्यास इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. तसेच फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड धारकांना 5 टक्के अनलिमिटेड कॅशबॅक मिळेल.
Redmi 10 2022 चे स्पेसिफिकेशन्स
Redmi 10 मध्ये 6.71-इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला कॉर्निंग गोरिल्ला ग्लासची सुरक्षा देण्यात आली आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित MIUI 13 वर चालतो . यात प्रोसेसिंगसाठी Qualcomm Snapdragon 680 SoC देण्यात आली आहे. तर ग्राफिक्ससाठी Adreno 610 GPU मिळतो. या देण्यासाठी फोनमध्ये 6GB RAM आणि 128GB पर्यंतची स्टोरेज आहे. स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं तर व्हर्च्युअल रॅम फिचरच्या मदतीनं 2GB पर्यंत रॅम वाढवता येतो.
फोटोग्राफीसाठी Redmi 10 2022 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 50MP चा प्रायमरी सेन्सर आणि 2MP चा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फ्रंटला 5MP चा सेन्सर मिळतो. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह यात रियर फिंगरप्रिंट सेन्सरची सुरक्षा मिळते. या फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी मोठी देण्यात आली आहे. जी 18W फास्ट चार्जिंगनं चार्ज करता येते.