Xiaomi चे स्वस्त स्मार्टफोन्स सब-ब्रँड Redmi अंतर्गत सादर केले जातात. असाच एक बजेट फ्रेंडली स्मार्टफोन कंपनीनं गुपचूप चीनमध्ये सादर केला आहे. MediaTek Helio G25 SoC सह Redmi 10A स्मार्टफोन कंपनीनं लाँच केला आहे. हा फिंगरप्रिंट स्कॅनर असलेला कंपनीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. ज्यात 5000mAh बॅटरी, 13MP कॅमेरा आणि 6GB रॅम देण्यात आला आहे.
Redmi 10A चे स्पेसिफिकेशन्स
Redmi 10A स्मार्टफोन 6.53-इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्लेसह सादर करण्यात आला आहे. कंपनीनं या स्मार्टफोनला ऑक्टा-कोर मीडियाटेक Helio G25 प्रोसेसरसह PowerVR8320 GPU ची प्रोसेसिंग पावर दिली आहे. रेडमीचा हा फोन अँड्रॉइड 11 बेस्ड MIUI 12.5 वर चालतो. सोबत 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यांतची स्टोरेज देण्यात आली आहे.
Redmi 10A स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसहा 13MP कॅमेरा देण्यात आला आहे. तर फ्रंटला 5MP चा सेल्फी शुटर आहे. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स तर मिळतात सोबत कमी किंमतीत देखील रियर फिंगरप्रिंट सेन्सरची सुरक्षा देण्यात आली आहे. Redmi 10A स्मार्टफोन 5000mAh च्या बॅटरीसह सादर झाला आहे, जी 10W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Redmi 10A ची किंमत
Redmi 10A स्मार्टफोनचे तीन व्हेरिएंट्स लाँच झाले आहेत. या फोनचा 4GB/64GB मॉडेल 649 युआन (सुमारे 7,740 रुपये), 4GB/128GB मॉडेल 799 युआन (सुमारे 9,500 रुपये) आणि 6GB/128GB मॉडेल 899 युआन (सुमारे 10,720 रुपये) मध्ये लाँच झाला आहे. हा फोन भारतात कधी येईल याची माहिती मात्र मिळाली नाही.