Xiaomi लवकरच आपल्या रेडमी ब्रँड अंतर्गत नेहमीच बजेट फ्रेंडली डिव्हाइसेस लाँच करत असते. त्यातही Redmi लाईनअप कंपनीची सर्वात स्वस्त स्मार्टफोन घेऊन येते. आता या लाईनअपमध्ये एंट्री लेव्हल स्मार्टफोन लाँच करू शकते. जो Redmi 10A नावानं बाजारात येईल. या सीरिजचा हा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आता गिकबेंच या बेंचमार्किंग वेबसाईटवर लिस्ट करण्यात आला आहे.
गिकबेंच लिस्टिंगवरून Redmi 10A स्मार्टफोनच्या Redmi 220233L2C या मॉडेल नबंरची माहिती मिळाली आहे. हा फोन एफसीसीवर देखील 220233L2G मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला होता. या लिस्टिंगमधून फोनच्या स्पेसिफिकेशन्स माहिती मिळाली आहे. या आगामी रेडमी स्मार्टफोनला गिकबेंचच्या सिंगल कोर टेस्टमध्ये 787 पॉईंट्स मिळाले आहेत. तर मल्टी कोर टेस्टमध्ये 3710 पॉईंट्स मिळाले आहेत.
Redmi 10A चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
या फोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात येईल जो MediaTek चा Helio G25 प्रोसेसर असू शकतो. सोबत 4GB पर्यंत रॅम देण्यात येईल. कंपनी 2GB आणि 3GB रॅम व्हेरिएंट देखील सादर करू शकते. तसेच स्टोरेज व्हेरिएंटची सुरुवात 32GB पासून होईल आणि सर्वात मोठा व्हेरिएंट 128GB स्टोरेजसह येईल. हा फोन अँड्रॉइड 10 बेस्ड MIUI 12.5 वर चालू शकतो.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात 13MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP चा सेकंडरी कॅमेरा असेल. या फोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर आणि 2.4GHz WiFi सपोर्ट मिळेल, असं लिस्टिंग मधून समजलं आहे. रेडमीच्या या आगामी एंट्री लेव्हल स्मार्टफोनमध्ये HD+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो. सोबत 5,000mAh किंवा 6,000mAh ची बॅटरी 10W फास्ट चार्जिंग स्पीडसह दिली जाऊ शकते.
हे देखील वाचा:
स्मार्टफोनला कव्हर वापरताय? त्याचे तोटेही अनेक आहेत, समजल्यावर काढून टाकाल...
Smart TV: Redmi चा 43 इंचाचा 4K स्मार्ट टीव्ही येतोय; कमी किंमतीत घालणार धुमाकूळ