आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला स्मार्टफोन कधीकधी जीवाला धोकादायक ठरू शकतो. याची अनेक उदाहरणे सतत समोर येत असतात. मग कधी सेल्फी घेताना जीव जातो तर कधी फोनमध्ये स्फोट होऊन माणूस जखमी होतो. अशीच बातमी केरळ मधून समोर आली आहे. जिथे एक मिस्टर सिंह यांच्या रेडमी 8 स्मार्टफोनमध्येस्फोट होऊन त्यामुळे त्यांच्या घरातील चार वर्षांची मुलगी जखमी झाली.
ही बातमी प्रसिद्ध लिक्सटर अभिषेक यादवच्या ट्विटव्हा माध्यमातून समोर आली आहे. मिस्टर सिंह यांनी ट्विट केले होते कि Xiaomi Redmi 8 मध्ये स्फोट झाला, त्यामुळे त्यांच्या घरातील एक लहान मुलगी जखमी झाली. त्यानंतर त्यांनी हे ट्विट डिलीट केले, परंतु अभिषेक यादवने या ट्विटचा स्क्रीनशॉट शेयर करून ही माहिती दिली.
जेव्हा स्फोट झालेला रेडमी 8 घेऊन सिंह सर्व्हिस सेंटरमध्ये गेले तेव्हा तिथल्या कर्मचाऱ्यांनी यात युजरचा दोष असल्याचे म्हटले आणि फोन दुरुस्त करण्यासाठी स्मार्टफोनच्या किंमतीच्या 50% रकमेची मागणी केली. परंतु त्यानंतर अभिषेक यादवने माहिती दिली आहे कि मिस्टर सिंह यांचा कंपनीने Redmi 8 च्या ऐवजी Redmi 9 अगदी मोफत दिला आहे. या घटनेसंबंधित कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया शाओमी कंपनीने दिलेली नाही.