अॅमेझॉन ग्रेट इंडियन सेल 2021 मध्ये अनेक ऑफर्स मिळत आहेत. परंतु या लेखात आपण बजेट सेगमेंटमधील स्मार्टफोनवरील ऑफर्स पाहणार आहोत. इथे तुम्हाला सेलमध्ये 9,000 रुपयांच्या आत मिळणाऱ्या बेस्ट स्मार्टफोनची माहिती देणार आहोत. चला जाणून घेऊया Budget Phones वरील बेस्ट ऑफर्स.
Nokia C01 Plus 4G
6,999 रुपयांचा Nokia C01 Plus चा 2GB रॅम आणि 16GB स्टोरेज मॉडेल सेलमध्ये 6,198 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा 5.45-इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने यात Unisoc SC9863a प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा सिंगल रियर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा सेल्फी शुटर देण्यात आला आहे. नोकिया सी01 प्लसमध्ये 3,000mAh ची बॅटरी मिळते.
Redmi 9A
Redmi 9A फोनच्या 2GB रॅम आणि 32GB व्हेरिएंटची किंमत 7,496 रुपये आहे, परंतु अॅमेझॉन सेल अंतर्गत हा फोन 6,799 रुपयांमध्ये मिळत आहे. या फोनमध्ये 6.53 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. प्रोसेसिंगसाठी मीडियाटेक हीलियो जी25 चिपसेट मिळतो. 13 मेगापिक्सलचा सिंगल रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. Redmi 9A मध्ये 5,000 एमएएचची बॅटरी आहे.
Realme narzo 50i
Realme Narzo 50i च्या 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज मॉडेलची किंमत 7,999 रुपये आहे, परंतु सेल मध्ये तुम्ही हा फोन 7,499 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता.
Realme Narzo 50i मध्ये 6.5-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. डिवाइसमध्ये Unisoc 9863 चिपसेट प्रोसेसिंगचे काम करतो. फोनमध्ये 4GB पर्यंतचा RAM आणि 64GB पर्यंतची बिल्टइन स्टोरेज देण्यात आली आहे, जी मायक्रोएसडी कार्डने 256GB पर्यंत वाढवता येईल. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित Realme UI Go एडिशन चालतो.
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 8-मेगापिक्सलचा एआय रियर कॅमेरा एलईडी फ्लॅशसह देण्यात आला आहे. तर या फोनच्या फ्रंटला 5-मेगापिक्सलचा एआय सेल्फी शुटर मिळतो. Realme Narzo 50i मध्ये 5,000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 43 दिवसांचा स्टँडबाय टाइम देऊ शकते, असा दावा कंपनीने केला आहे.
Tecno Spark 7T
Tecno Spark 7T फोनचा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट 10,999 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. परंतु फेस्टिव्ह सेलमध्ये या फोनसाठी 8,499 रुपये मोजावे लागतील. या फोनमध्ये 6.52-इंचाचा एचडी+ आयपीएस डिस्प्ले मिळतो. कंपनीने डिवाइसला मीडियाटेक हीलियो जी35 प्रोसेसरची पॉवर दिली आहे. फोनमधील ड्युअल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर आणि एक AI कॅमेरा आहे. तर फ्रंटला 8 मेगापिक्सलचा सेल्फी शुटर आहे. या फोनमध्ये 6,000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.