शाओमीच्या सब-ब्रँड Redmi ने आपल्या नव्या गेमिंग लॅपटॉपची माहिती दिली आहे. कंपनीने Redmi G 2021 गेमिंग लॅपटॉप 22 सप्टेंबरला लाँच होणार असल्याचे सांगितले आहे. याची माहिती कंपनीने एका टीजरच्या माध्यमातून सोशल मीडियावर दिली आहे, याव्यतिरिक्त इतर कोणतीही माहिती कंपनीने दिली नाही. रेडमी ब्रँड अंतर्गत हा दुसरा गेमिंग लॅपटॉप असेल, जो कमी किंमतीत दमदार गेमिंग परफॉर्मन्स देईल. या सीरिजमध्ये याआधी सादर करण्यात आलेल्या Redmi G लॅपटॉपची किंमत CNY 5299 (सुमारे 60,000 रुपये) ठेवण्यात आली होती.
Redmi G 2021
Redmi G 2021 हा पुढील आठवड्यात सादर होणारा किफायतशीर गेमिंग लॅपटॉप आहे. कंपनीने चिनी सोशल मीडिया विबोवर या लॅपटॉपचा टीजर पोस्टर शेयर केला आहे. या पोस्टरमधून हा डिवाइस 22 सप्टेंबरला सादर केला जाईल असे समजले आहे. कंपनीने अधिकृतपणे आगामी गेमिंग लॅपटॉपच्या स्पेक्सची माहिती दिली नाही. परंतु हा गेल्यावर्षीच्या मॉडेलच्या तुलनेत अपग्रेडेड स्पेक्ससह सादर केला जाऊ शकतो.
गेल्यावर्षी सादर झालेला रेडमी गेमिंग लॅपटॉप लोकांना आवडला होता. यात 16.1-इंचाचा मोठा डिस्प्ले आहे , 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. कंपनीने यात 10th gen Intel Core चिपसेटचा वापर केला आहे. त्यामुळे 2021 मॉडेलमध्ये 11th gen Intel Core प्रोसेसर दिला जाऊ शकतो. तसेच यात 16GB पर्यंत RAM आणि 144Hz किंवा त्यापेक्षा जास्त रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले मिळू शकतो.
टीजर पोस्टरमध्ये नवीन Redmi G 2021 मॉडेल हलका आणि स्लिक डिजाईनसह सादर केला जाईल असे वाटत आहे. तसेच हा एक हाय- एन्ड डिवाइस असेल असे दिसत आहे, त्यामुळे हा गेमिंग लॅपटॉप गेल्यावर्षीच्या तुलनेत महाग असू शकतो. तसेच हा रेडमी लॅपटॉप भारतात येण्याची शक्यता देखील खूप कमी आहे.