शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
4
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
5
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
6
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
7
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
8
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
9
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
11
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
12
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
13
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
15
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
16
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
17
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
18
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
19
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
20
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी

16GB रॅमसह Redmi G 2021 गेमिंग लॅपटॉप लाँच; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये 

By सिद्धेश जाधव | Published: September 22, 2021 3:37 PM

Cheap Gaming Laptop Redmi G 2021 Price: शाओमीने Redmi G 2021 गेमिंग लॅपटॉप चीनमध्ये सादर केला आहे. हा लॅपटॉप दोन व्हेरिएंटसह बाजारात आला आहे.  

Redmi ने आपला नवीन गेमिंग लॅपटॉप Redmi G 2021 चीनमध्ये सादर केला आहे. Intel आणि AMD अश्या दोन व्हेरिएंटसह हा लॅपटॉप बाजारात आला आहे. या दोन्ही व्हेरिएंटमध्ये 144Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले, 16GB पर्यंतचा RAM आणि RTX 3060 ग्राफिक्स देण्यात आला आहे.  

Redmi G 2021 गेमिंग लॅपटॉपचे स्पेसिफिकेशन्स 

या रेडमी लॅपटॉपमध्ये 16.1-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. लॅपटॉप Intel Core i5-11260H प्रोसेसर आणि AMD च्या Ryzen 7 5800 अश्या दोन प्रोसेसर व्हेरिएंटसह बाजारात आला आहे. हे दोन्ही व्हेरिएंट 16GB पर्यंतच्या RAM आणि 512GB स्टोरेजसह विकत घेता येतील. Windows 10 सह येणार हा लॅपटॉप लवकरच विंडोज 11 वर अपडेट करता येईल.  

गेमिंग करताना लॅपटॉप गरम होऊ नये म्हणून रेडमी जी 2021 मध्ये Hurricane Heat Dissipation 3.0 सिस्टम देण्यात आली आहे. ही ड्युअल फॅन आणि चार आउटलेटसह लॅपटॉपमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. AMD व्हेरिएंटमध्ये देखील कॉपर लीट पाइप देण्यात आला आहे. Redmi G 2021 च्या इंटेल व्हेरिएंटमध्ये 180W चा पॉवर अडॅप्टर मिळतो, तर AMD मॉडेलसह 230W चा पॉवर अडॅप्टर देण्यात आला आहे. हा लॅपटॉप Wi-Fi 6, DTX: X Ultra Sound, बॅकलिट कीबोर्ड, Xiao AI स्मार्ट असिस्टंट, थंडरबोल्ट 4, USB-C आणि शाओमी गेम बॉक्स सपोर्टसह लाँच करण्यात आला आहे.  

Redmi G 2021 ची किंमत 

Redmi G 2021 चा AMD व्हेरिएंट 6,999 युआन (जवळपास 79,800 रुपये) मध्ये शाओमी मॉलवर 28 सप्टेंबरपासून विकत घेता येईल. तर इंटेल मॉडेल 5699 युआन (जवळपास 65,000 रुपये) मध्ये शाओमी मॉलवर 23 सप्टेंबरपासून उपलब्ध होईल. हा लॅपटॉप भारतासह जगभरात कधी उपल्बध होईल हे मात्र कंपनीने सांगितले नाही.  

टॅग्स :xiaomiशाओमीlaptopलॅपटॉप