शाओमीच्या सब-ब्रँड रेडमीची Redmi K50 स्मार्टफोन सीरीज सध्या जास्त चर्चेत आहेत. या सीरिजमध्ये कंपनी Redmi K50 आणि Redmi K50 Pro असे दोन स्मार्टफोन लाँच करू शकते. गेले अनेक दिवस या सीरिजचे स्पेसिफिकेशन्स लिक्समधून समोर आले आहेत. आज टिपस्टर मुकुल शर्माने रेडमी के50 सीरीजसंबंधित नवीन लीक शेयर केला आहे, त्यानुसार या सीरिजमध्ये 120W फास्ट चार्जिंग, 108MP कॅमेरा आणि क्वालकॉमचा आगामी शक्तिशाली Snapdragon 898 चिपसेट मिळणार आहे.
काही दिवसांपूर्वी लीक झालेल्या रेडमी के50 सीरीजच्या फोटोनुसार या स्मार्टफोनमध्ये पंच होल डिस्प्ले दिला जाऊ शकतो, हा पंच होल मध्यभागी असेल. हा फोन बेजल लेस आणि नॅरो एज असलेल्या डिस्प्लेसह सादर केला जाईल. सह ऐजेज असलेला दिखाई गई आहे. फोनच्या रियर पॅनलवर पॅनलच्यावर आलेला वर्टिकल शेप कॅमेरा सेटअप दिसत आहे. ही डिजाईन Redmi K50 ची आहे कि Redmi K50 Pro हे मात्र समजले नाही.
Redmi K50 आणि Redmi K50 Pro चे स्पेसिफिकेशन्स
समोर आलेल्या लिकेनुसार Redmi K50 स्मार्टफोनमध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. तर Redmi K50 Pro 108 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर मिळू शकतो. Redmi K50 स्मार्टफोन 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल. तसेच Pro व्हर्जनमध्ये 120वॉट फास्ट चार्जिंग असेल. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये क्वॉलकॉमचा शक्तिशाली स्नॅपड्रॅगन 895 किंवा स्नॅपड्रॅगन 898 चिपसेट दिला जाऊ शकतो. टिप्सटर डिजीटल चॅट स्टेशनने सांगितले होते कि, Redmi K50 सीरीजमध्ये 2K रिजोल्यूशन असलेला डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह दिला जाऊ शकतो. तसेच या रेडमी फोनमध्ये Samsung E5 लुमिनस मटेरियलचा वापर केला जाईल.