Redmi नं चीनमध्ये लवकरच K सिरीजचे स्मार्टफोन येणार असल्याचं सांगितलं आहे. ही कंपनीची किफायतशीर फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरिज आहे. यात प्रोसेसर आणि अन्य स्पेसिफिकेशन्स फ्लॅगशिप लेव्हल असतात परंतु किंमत कितीतरी कमी असते. भारतात ही सीरिज रीब्रँड करून लाँच केली जाते. गेल्यावर्षी चीनमध्ये आलेले Redmi K40 series स्मार्टफोन देशात Mi 11X आणि Poco F3 सीरिजमध्ये आले होते.
Redmi K50 सीरीज पुढील महिन्यात चीनमध्ये पदार्पण करेल. परंतु लाँचपूर्वीच या सीरिजच्या स्मार्टफोन्सची माहिती येण्यास सुरुवात झाली आहे. यात काही महत्वाच्या स्पेक्सचा समावेश आहे आणि आता तर Redmi K50 Pro स्मार्टफोनचे डिजाइन रेंडर देखील लीक झाले आहेत. त्यावरून या स्मार्टफोनच्या आकर्षक डिजाईनचा अंदाज लावता आला आहे.
Xiaomi Redmi K50 Pro ची डिजाइन
लीक रेंडर्सनुसार, Redmi K50 Pro स्मार्टफोन पंच होल कटआउट असलेल्या डिजाईनसह बाजारात येईल. तसेच यात 6.67-इंचाचा Full HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात येईल. हा डिस्प्ले 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. रेंडरमध्ये फोनच्या उजवीकडे फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात येईल. हा सेन्सर पॉवर बटनमध्ये एम्बेड केला जाऊ शकतो.
Redmi K50 Pro स्मार्टफोनच्या मागे एक आयताकृती कॅमेरा मॉड्यूल मिळेल. ज्यात एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरा सेन्सर्स मिळू शकतात. याआधी आलेल्या लीकनुसार यात 64MP Sony IMX686 हा प्रायमरी सेन्सर असेल. सोबत 13MP OV13B10 अल्ट्रा-वाईड सेन्सर आणि 2MP GC02M1 किंवा 8MP OV08A10 मॅक्रो कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो.
हे देखील वाचा:
हॅकर्सच्या हातात आयतं कोलीत देऊ नका; UPI पेमेंट करताना या 5 चुका टाळा, नाही तर...
संधी सोडू नका! Apple iPhone चे तीन मॉडेल मिळतायत डिस्काउंटवर; अशा आहेत Flipkart, Amazon च्या ऑफर्स