Redmi आपला नवीन स्मार्टफोन Redmi K50i 5G भारतीय बाजारात लाँच करणार आहे. या हँडसेटसह, कंपनी पुन्हा एकदा के-सिरीज भारतात आणत आहे. दुपारी 12 वाजता हा स्मार्टफोन लाँच केला जाईल. ब्रॅन्डच्या सोशल मीडिया हँडलवर फोनचे लाँचिंग लाईव्ह पाहता येणार आहे. स्मार्टफोनसोबत कंपनी Redmi Buds 3 Lite Buds देखील लाँच करू शकते.
रेडमी फोनच्या खास फीचर्सबद्दल सांगायचं तर, त्यात डॉल्बी व्हिजन टेक्नॉलॉजी सपोर्ट असेल. कंपनी हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 8100 प्रोसेसर लाँच करणार असल्याची माहिती यापूर्वीच कंपनीनं दिली आहे. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये 5080mAh ची बॅटरी मिळू शकते. दरम्यान, हा स्मार्टफोन 67W फास्ट चार्जिंगसह येण्याचीही शक्यता आहे. चिनी बाजारपेठेत हा स्मार्टफोन यापूर्वीच लाँच करण्यात आला आहे. Redmi Note 11T Pro Plus 5G या नावाने हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आलाय.
काय असेल खास?Redmi की डिव्हाइस फँटम ब्लू, क्विक सिल्व्हर आणि स्टिल्थ ब्लॅक या तीन रंगात लाँच केले जाईल. तुम्ही 22 जुलैपासून Amazon वरून Redmi K50i 5G खरेदी करू शकाल. कंपनीने या स्मार्टफोनची किंमत जाहीर केलेली नाही, परंतु ती 30 हजारांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.
Redmi K50i 5G मध्ये 6.6-इंचाचा 2460x1080 रिझोल्यूशन फुल HD+ LCD डिस्प्ले देण्यात येईल. याशिवाय यात 144Hz चा रिफ्रेश रेट दिला जाईल. या स्मार्टफोनमध्ये डॉल्बी व्हिजनचाही सपोर्ट असेल. याशिवाय यात 5080mAh बॅटरी आणि 67W फास्ट चार्जिंग दिले जाऊ शकते. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 8100 प्रोसेसर देण्यात येणार आहे. शिवाय यामध्ये 64MP चा प्राइमरी रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. तुम्हाला 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो लेन्स मिळण्याची शक्यता आहे. पुढील बाजूला 16MP सेल्फी कॅमेरा असेल. यात MIUI 13 मिळेल, जो Android 12 वर आधारित असेल.