शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
3
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
4
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
5
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
6
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
7
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
9
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
10
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
11
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
12
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
13
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
15
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
16
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
17
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
19
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
20
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी

पावनखिंड, द काश्मीर फाईल्स किंवा बघा झुंड; 100 इंचाचा हा Smart TV देईल घरच्या घरी थिएटरचा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 3:13 PM

शाओमीनं आपल्या सब-ब्रँड रेडमी अंतर्गत Redmi Max 100-inch Ultra-HD LED TV लाँच केला आहे.

सध्या बॉक्स ऑफिसवर झुंड, पावनखिंड आणि द काश्मीर फाईल्स अशा एकापेक्षा एक लोकप्रिय चित्रपटांची गर्दी आहे. हे सिनेमे हाउसफुल जात असल्यामुळे अनेकांना थिएटरमध्ये जाऊ बघता येत नाहीत. काही लोक या चित्रपटांच्या ओटीटी लाँचची वाट बघत आहेत. यातील पावनखिंड तर उद्याच अ‍ॅमेझॉन प्राईमवर दाखल होणार आहे. परंतु थिएटर सारखा अनुभव घरी हवा असेल तर मोठा टीव्ही असणं आवश्यक आहे. म्हणूनच शाओमीनं आपल्या सब-ब्रँड रेडमी अंतर्गत Redmi Max 100-inch Ultra-HD LED TV लाँच केला आहे.  

100 इंचाच्या Smart TV चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स  

रेडमी मॅक्स 100-इंचाच्या टीव्हीमध्ये एक 4K आयपीएस पॅनल देण्यात आला आहे. जो 120Hz रिफ्रेश रेट, 700 निट्स पीक ब्राईटनेस, डॉल्बी विजन, आयमॅक्स एन्हान्स्ड आणि एचडीआरला सपोर्ट करतो. या टीव्हीमध्ये क्वॉड-कोर प्रोसेसर आहे ज्यात Cortex-A73 कोर आणि एक Arm Mali-G52 MC1 जीपीयूचा समावेश आहे. सोबत 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज देण्यात आली आहे. ऑडिओसाठी डॉल्बी डिजिटल प्लस आणि डॉल्बी अ‍ॅटमॉस सपोर्टसह 30W चा स्पिकर देण्यात आला आहे.  

कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय 6, तीन एचडीएमआय पोर्ट, दोन यूएसबी पोर्ट आणि एक ईथरनेट पोर्ट मिळतो. या टीव्हीमधील 178 डिग्री व्यूइंग अँगल सपोर्ट कोणत्याही कोपऱ्यातून तुम्हाला स्पष्ट चित्र दिसतं. गेमर्ससाठी या स्मार्ट टीव्हीमध्ये खास फीचर्स आहेत ज्यात वेरिएबल रिफ्रेश रेट आणि ऑटो लो लेटेंसी मोडचा समावेश आहे. 

Redmi Max 100-inch Ultra-HD LED TV ची किंमत 

कंपनीनं हा स्मार्ट टीव्ही सध्या चीनमध्ये सादर केला आहे. तिथे रेडमी मॅक्स 100-इंच टीव्हीची किंमतCNY 19,990 युआन (सुमारे 2,39,500 रुपये) ठेवण्यात आली आहे. हा टीव्ही ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये 6 एप्रिलपासून चीनमध्ये विकत घेता येईल. भारतीय उपलब्धतेची मात्र कंपनीनं कोणतीही माहिती दिली नाही. पंरतु लवकरच या टीव्ही सोबत रेडमी मॅक्स 85 इंचाचा मॉडेल भारतीयांच्या भेटीला येऊ शकतो. 

टॅग्स :xiaomiशाओमीTelevisionटेलिव्हिजनtechnologyतंत्रज्ञान