भारतात Redmi Note 10 सीरिज येत्या ४ मार्च रोजी लाँच होणाक आहे. या सीरिज अंतर्गत तीन मॉडेल edmi Note 10, Redmi Note 10 Pro आणि Redmi Note 10 Pro Max लाँच केली जाण्याची शक्यता आहे. Note 10 सीरिजच्या हाय एन्ड मोबाईलमध्ये 5G कनेक्टिव्हीटी असण्याची शक्यताही आहे. दरम्यान, आता Redmi Note 10 मध्ये 108 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा असणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. रेडमीसाठी हे मोठं पाऊल मानलं जात आहे. सहसा 108 मेगापिक्सेलचा कॅमेरा हा हाय एन्ड स्मार्टफोन्समध्येच पाहायला मिळतो. Xiaomi इंडियाचे प्रमुख मनू कुमार जैन यांनी ट्विटरवर आगामी Redmi Note 10 सीरिजचा रिटेल बॉक्ससह फोटो शेअर केला. यामध्ये फोनच्या डिझाईनसह यासोबत येणाऱ्या 108 मेगापिक्सेलच्या कॅमेऱ्याची डिटेलही कन्फर्म करण्यात आली आहे. बॉक्सवरून या सीरिजच्या स्मार्टफोन्समध्ये पंच होल डिस्प्ले असल्याचंही दिसत आहे. तसंच मागील बाजूला अन्य कॅमेऱ्यांसह एक LED फ्लॅशही दिसत आहे. हा मोबाईलदेखील गोल्ड कलरमध्ये लाँच केला जाईल. यामध्ये फिंगरप्रिन्ट सेन्सर देण्यात आला नसून तो ऑन डिस्प्ले किंवा साईड माऊंटेड असण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Redmi Note 10 सीरिजचा फर्स्ट लूक आला समोर; स्मार्टफोनमध्ये मिळणार १०८ मेगापिक्सेलचा कॅमेरा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 4:02 PM
Redmi Note 10 - पाहा काय असतील या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स
ठळक मुद्देया स्मार्टफोन्समध्ये 108 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. मनू जैन यांनी केला फोनचा लूक रिव्हील